Junnar: 'विघ्नहर'ला देश पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'विघ्नहर'ला देश पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

'विघ्नहर'ला देश पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा गाळप हंगाम २०२०-२१ साठीचा राष्ट्रीय पातळीवरील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

नवी दिल्ली येथे आज मंगळवार ता.१६ रोजी पद्मविभुषन खासदार शरद पवार,सहकार राज्यमंत्री बी.एल.वर्मा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर,उपाध्यक्ष केतनभाई पटेल,कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी मागील गळीत हंगाम २०१९-२० साठीचा उच्च साखर उतारा विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही कारखान्याला देण्यात आला.

हेही वाचा: अकोला : चालकाने पोलिसाच्या अंगावर घातला आयशर

सलग दोन वर्ष उच्च साखर उतारा विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करणारा विघ्नहर कारखाना देशातील एकमेव कारखाना ठरला आहे. कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर,उपाध्यक्ष अशोक घोलप,कार्यकारी संचालक भास्कर घुले,सर्व संचालक व अधिकारी यांनी दोन्ही पुरस्कार स्विकारले.

अध्यक्ष शेरकर म्हणाले, सद्यस्थितीत साखर कारखानदारी अनेक समस्यांना तोंड देत आहे. कारखान्याने कठीण परिस्थितीत उपलब्ध तांत्रिक कार्यक्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करुन सलग दोनही हंगामामध्ये विक्रमी ऊस गाळप केले आहे. तसेच अधिकाधिक साखर उतारा राखण्यात यश मिळविले आहे. सहवीजनिर्मीती आणि डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले सहवीज निर्मीती प्रकल्पातून जास्तीत जास्त युनिटवीज निर्यात केली आहे. डिस्टीलरीमधून दोनही हंगामामध्ये जास्तीत जास्त इथेनॉलची निर्मीती केली आहे. पारदर्शकपणे तसेच काटकसरीने कारखाना चालविल्यामुळे देशपातळीवरील सलग दोन पुरस्कार मिळाले आहेत. सभासद, ऊस उत्पादक, कर्मचारी यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: निर्देशांकांमध्ये घसरण; वाहन उद्योग टॉप गिअरमध्ये

यावर्षीचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले आहे. ऊस विकास विभागामार्फत ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावे सुरु आहेत. सर्व सभासद व ऊस उत्पादकांनी आपला ऊस विघ्नहरला घालावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

loading image
go to top