सह्याद्रीच्या मातीत मिळाले कर्करोगाचे औषध

सम्राट कदम
Friday, 6 November 2020

वीर योद्‌धे, संत आणि क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी सह्याद्रीची माती ही गुणकारी औषधांचाही खजिना आहे. या मातीत आढळणाऱ्या ‘स्ट्रेप्टोमायसीस’ प्रकारातील जिवाणूंपासून मिळणारे ‘उर्डमायसीन’ हे औषध कर्करोगासाठी अधिक प्रभावी ठरत असल्याचा शोध पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि तिरुअनंतपुरम येथील जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनीक गार्डन ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे.

पुणे - वीर योद्‌धे, संत आणि क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी सह्याद्रीची माती ही गुणकारी औषधांचाही खजिना आहे. या मातीत आढळणाऱ्या ‘स्ट्रेप्टोमायसीस’ प्रकारातील जिवाणूंपासून मिळणारे ‘उर्डमायसीन’ हे औषध कर्करोगासाठी अधिक प्रभावी ठरत असल्याचा शोध पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि तिरुअनंतपुरम येथील जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनीक गार्डन ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉ. सईद दस्तगीर आणि तिरुअनंतपुरम येथील संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. विपिन मोहन डॅन, विनोध जे. एस. यांचे हे संशोधन ‘एसीएस केमिकल बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी निसर्गतःच मिळणाऱ्या जैविक रसायनांचा किंवा औषधाचा वापर करण्यासाठी जगभरात संशोधन करण्यात येत आहे. सध्या केमोथेरपीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘रॅपामायसिन’ या औषधांसोबत उर्डमायसीन वापरल्यास ते अधिक प्रभावी ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. गर्भाशयाशी निगडित पेशींवर हे संशोधन झाले.

कोरोनाची लस लोकांपर्यंत पोचविण्याचे आव्हान; जिल्हा प्रशासन लागले कामाला

कर्करोगाला कारणीभूत प्रथिनांचे संदेश वहनच रोखण्याचे काम उर्डमायसीन करते. त्यामुळे कर्करोगांच्या पेशीची वाढ तर थांबते त्याचबरोबर त्या मृत्यूही पावतात. जैवविविधतापूर्ण पश्‍चिम घाटाच्या मातीतील जिवाणूंमुळे हे शक्‍य झाले आहे. 
- डॉ. सईद दस्तगीर, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे

उर्डमायसीन का प्रभावी 

  • कर्करोगामध्ये पेशींची अनियंत्रित वाढीसाठी ‘एमटॉर’ नावाचे प्रथिन कारणीभूत असते
  • मागील दोन दशकांच्या संशोधनातून ‘एमटॉर’ प्रथिनामध्ये एमटॉरसी१ आणि एमटॉरसी२ असे दोन प्रकार असल्याचे समोर आले
  • रॅपामायसिन हे फक्त एमटॉर१ याच प्रथिनाला प्रतिबंधित करते. मात्र, नव्याने शोधलेले ‘उर्डमायसीन’ हे दोन्ही प्रकारांच्या प्रथिनांना प्रतिबंधित करते.

दिवाळीनिमित्त गावी जाताय; पुण्यातून सुटणार एसटीच्या जादा गाड्या!

उर्डमायसीनची वैशिष्ट्ये 

  • पश्‍चिम घाटात आढळणाऱ्या स्ट्रेप्टोमायसीस ओए२९३ या जीवाणूपासन विकसित करण्यात येते
  • न्यूक्‍लिअर मॅग्नेटिक रेसोनन्स ॲण्ड मॅग्नेटिक स्पेक्‍ट्रोस्कोपी या सूक्ष्मदर्शिकेच्या साह्याने ‘उर्डामायसीन’ मध्ये व्ही आणि ई असे प्रकार असल्याचे स्पष्ट
  • सध्या बाजारात उपलब्ध आणि केमोथेरपीत वापरता येईल

हे औषध - 
१) कर्करोगाच्या पेशींना थेट मारते 
२) कर्करोगाच्या पेशींचा अन्न पुरवठा किंवा पोषणाचा मार्ग बंद करते

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer medicine found in Sahyadri soil