असिफाच्या न्यायासाठी नागरीक रस्त्यावर

बाबा तारे
सोमवार, 23 एप्रिल 2018

पाषाण सूस रस्ता परिसरात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 'जस्टीस फॉर असिफा' या बलात्कार विरोधी कार्यक्रमात निषेध व्यक्त करण्यात आला व मेणबत्ती पेटवून असिफाला श्रध्दांजली वाहण्यात आली.

पुणे (औंध) - बलात्कार करुन हत्या करण्यात आलेल्या असिफा या बालिकेच्या मृत्युनंतर तरी तिच्या अपराध्यांना शिक्षा व्हावी, तिला व तिच्या कुटूंबियांना खरा न्याय मिळायला हवा यासाठी पाषाण सूस रस्त्यावर नागरीकांनी निषेध व्यक्त केला. पाषाण सूस रस्ता परिसरात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 'जस्टीस फॉर असिफा' या बलात्कार विरोधी कार्यक्रमात निषेध व्यक्त करण्यात आला व मेणबत्ती पेटवून असिफाला श्रध्दांजली वाहण्यात आली. याविरोधात निषेध करतांना नागरीकांनी आरोपीस फाशीची शिक्षा  झालीच पाहिजे याची जोरदार मागणी केली. यावेळी सुस रस्ता परिसरातील नागरीक, संयुक्त जयंती उत्सव समितीचे व स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, अमित खानेकर, समिर उत्तरकर, अॅड. अरविंद तायडे व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Candle March For Asifa