Inter Scordan Boxing Tournament
Inter Scordan Boxing Tournamentesakal

Boxing Tournament : बॉक्सिंग स्पर्धेत डोक्याला गंभीर दुखापत; रक्तस्रावामुळं कॅप्टन महालेंचं उपचारादरम्यान निधन

डोक्यातील अंतर्गत रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती.
Summary

कॅप्टन महाले यांनी १६ ऑक्टोबरला सुरू झालेल्या इंटर स्कॉर्डन बॉक्सिंग स्पर्धेत (Inter Scordan Boxing Tournament) सहभाग घेतला होता.

पुणे : खडकवासला (Khadakwasla) येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील कॅडेट कॅप्टन प्रथमेश महाले यांचे बुधवारी पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. महाले हे महाराष्ट्रातील असून त्यांनी या प्रबोधिनीच्या १४५ व्या अभ्यासक्रमासाठी ११ एप्रिल २०२१ रोजी प्रवेश घेतला होता.

कॅप्टन महाले यांनी १६ ऑक्टोबरला सुरू झालेल्या इंटर स्कॉर्डन बॉक्सिंग स्पर्धेत (Inter Scordan Boxing Tournament) सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या वेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डोक्यातील अंतर्गत रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती.

Inter Scordan Boxing Tournament
Konkan Politics : ठाकरे गटातील नाराज नेते लवकरच शिंदे गटात येणार, राऊतांनी गळती थांबवावी; उदय सामंतांचा टोला

त्यामुळे त्यांना उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्या डोक्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. परंतु, अंतर्गत रक्तस्रावामुळे बुधवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com