esakal | नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनो सांभाळा; नाहीतर होणार कडक कारवाई

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनो सांभाळा; नाहीतर होणार कडक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - खासगी रुग्णालयाशी (Hospital) करार करून प्रभागात कोविड केअर सेंटर (सीसीसी) (Covid Care Center) सुरू करण्यासाठी नगरसेवक (Corporator) पक्षांचे पदाधिकारी (Office Bearers) आग्रही आहेत. ताबडतोब परवानगी (Permission) मिळावी यासाठी ते आरोग्य विभागात ठाण मांडून बसले आहेत. असे असले तरीही पालिकेचे विभागीय अधिकारी सेंटरवर लक्ष ठेवून आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई (Crime) केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Care of Corporators Office Bearers Otherwise strict action will be taken)

शहरात कोरोना झालेल्या गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध करून देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सरकारने दिलेल्या परवानगीनुसार खासगी रुग्णालयांना ‘सीसीसी’साठी परवानगी दिली आहे. पुणे शहरात ९ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधी २६ ‘सीसीसी’ सुरू झाले आहेत. जागेवर पाहणी न करता अग्निशामक दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणली जात आहे.

सध्या साध्या बेडसह ऑक्सिजन बेड, आयसीयू बेडला परवानगी मिळावी यासाठी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी दबाव टाकत आहेत. परंतु, शहरात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने हे अधिकार आयुक्तांनी स्वतःकडे घेतल्याने माननीयांचे आयुक्त कार्यालयात खेटे मारण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा: आई-पत्नीचे दागिने गहाण ठेवून केले कोविड हॉस्पिटल सुरू

गंभीर रुग्णावर उपचारास बंदी

‘सीसीसी’मध्ये गंभीर रुग्णावर उपचार सुरू ठेवणे योग्य नाही, त्यास त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक आहे. ‘सीसीसी’मध्ये दाखल रुग्णाचा एचआरसीटी स्कोर १८ असतानाही  रुग्णावर उपचार सुरू असल्याने त्याला रेमडेसिव्हिर द्या, अशी मागणी नगरसेवक करत आहेत. ‘सीसीसी’मध्ये लक्षण नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्याच रुग्णाला ठेवले पाहिजे.

सरकारच्या नियमावलीप्रमाणे ‘सीसीसी’ला परवानगी दिली जात आहे. तेथील रुग्णांची जबाबदारी रुग्णालयांची आहे. नियमाप्रमाणे ‘सीसीसी’ सुरू आहेत की नाही, याची पाहणी पालिकेचे विभागीय वैद्यकीय अधिकारी करत आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. पालिकेने नागरिकांसाठी ‘सीसीसी’ सुरू केले आहेत. तेथे जागा उपलब्ध आहे.

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

माझी आई सिंहगड रस्ता परिसरातील खासगी ‘सीसीसी’मध्ये दाखल झाली होती. तेथून तिला दीड दिवसात रुग्णालयात दाखल केले. त्यासाठी २० हजार रुपये घेण्यात आले आहेत.

- एक नागरिक