esakal | पॉलिमर इंजिनिअरिंग म्हणजे काय? 'या' आहेत करिअरच्या संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Career opportunities in polymer engineering.jpg

पॉलिमर इंजिनिअरिंग ही शाखा दिवसेंदिवस विकसित होत आहे, त्यामुळे आपले जीवन सुसह्य करीत आहे. मग जाणून घ्या, बारावीनंतर या क्षेत्रातील संधी...

पॉलिमर इंजिनिअरिंग म्हणजे काय? 'या' आहेत करिअरच्या संधी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात अगदी घरगुती वापरापासून ते अवकाशापर्यंत पॉलिमरचा वापर केला जातो. पॉलिमरचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. टूथब्रश, कॉस्मेटिकसपासून ते मोबाईल, टिव्हीपर्यंत आणि वाहन निर्मितीपासून सरंक्षणक्षेत्रापर्यंत, शेतीपासून बांधकाम, वस्त्रनिर्मिती क्षेत्रापर्यंत, आरोग्यक्षेत्रापासून अंतराळापर्यंत पॉलीमरचा वापर अनिवार्य झाला आहे आणि तो वाढतच राहील. त्याचबरोबर येणाऱ्या काळात पॉलीमर्सची पयार्वरणपूरक निर्मिती आणि योग्य पुनर्वापर करण्याच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
पॉलीमरची निर्मिती, प्रक्रिया आणि त्यांचा विविध क्षेत्रांमध्ये वापर करण्यासाठी केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर तसेच मटेरिअल सायन्स अँड इंजिनिअरिंगमधील ज्ञान व सिद्धांताच्या आधारावर पॉलिमर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाते. 

अरे बापरे ! चक्क त्यांनी यासाठी टेरेस घेतलेत भाड्याने  

भारतामध्ये दरवर्षी पॉलिमर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर कच्चा माल तयार करते आणि त्याची निर्यात करते. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक मोल्डिंग, पॉलिमर फिल्म्स, लिखाण साहित्य, प्लास्टिकच्या विणलेल्या सॅक आणि बॅग्स, सॅनिटरी फिटिंग, प्रयोगशाळा तसेच वैद्यकीय क्षेत्रात आवश्यक साहित्य, मत्स्य उद्योगात आवश्यक असणारे फिश नेटसारखे साहित्य, प्रवासाचे सामान इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. पॉलिमर इंडस्ट्री वाहतूक उद्योग, कन्ज्यूमर पॅकेजिंग, दूरसंचार आणि वीज उद्योगालाही साहित्य पुरवते.
भारतात दरवर्षी पॉलिमर प्रॉडक्ट्सची मागणी वाढतेच आहे. पॉलिमर इंडस्ट्रीची वाढ दरवर्षी साधारणतः वार्षिक दहा ते तेरा टक्क्यांनी होत आहे. त्याचा मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी होत राहील.  पॉलीमरचा विविध क्षेत्रातील वाढत जाणारा वापर आणि त्याची गरज यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पॉलिमर इंजिनिअरिंग क्षेत्रात भारतात व भारताबाहेर प्रामुख्याने आदित्य बिर्ला केमिकल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज्, घरडा केमिकल्स, गेल, एचपीसीएल, बीपीसीएल, ओएनजीसी, फिनोलेक्स, सुप्रिम इंडस्ट्रीज, भन्साली इंजिनिअरिंग, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा केमिकल्स, अपोलो टायर्स, सीएट टायर्स, एटीसी टायर्स, बीएएसएफ, डाऊ केमिकल्स,  ड्युपाँट, क्लेरियन्ट,  बजाज ऑटो, टाटा मोटर्स, टीव्हीएस मोटर्स, अशोक लेलँड, गुरित, हंट्समन, एशियन पेन्ट्स, गरवारे, किंगफा, कॅमलिन, स्टीयर इंजिनिअरिंग, पिडिलाइट, सिंटेक्स, रिलायन्स कॉम्पोजिट्स, पॉलीवन पॉलीमर्स, एपीपीएल इंडस्ट्रीज, एम फिल्टरटेक, जेएसडब्ल्यु पेन्ट्स, कॉस्मो फिल्म्स, डिएसएम इंजिनिअरिंग प्लास्टिकस, व्हेरॉक इंजिनिअरिंग, टाटा ऑटोकॉम् सिस्टिम्स, महिंद्रा कॉम्पोजिट्स, पोलमन इंडिया लिमिटेड, अजाईल प्रोसेस केमिकल्स यासारख्या अनेक कंपन्या अग्रेसर आहेत. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग, टेक्नोकमर्शीअल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल, मोल्ड अँड प्रोडक्ट डिजाइन अँड डेव्हलपमेंट इत्यादी विभागात पॉलिमर इंजिनियरना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.

ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास 
पॉलिमर इंजिनियरना नोकरी व्यतिरिक्त स्वतःचा व्यवसाय पण करता येतो. व्यवसायामध्ये प्रामुख्याने पॉलिमर इंजिनियर, पॉलिमरच्या कच्च्या मालाचा व्यापार, पॉलिमर कंपाऊंडिंग संबंधित व्यापार, नैसर्गीक आणि मानवनिर्मित पॉलिमर कच्च्या मालाचा उपयोग विविध उच्च गुणवत्तेचा व ग्राहकोपयोगी प्लास्टिक, रबर, फायबर, पेन्ट्स, प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स, ऍडव्हान्स लाईट वेट स्ट्रकचरल कॉम्पोसिट्स इत्यादी वस्तुंच्या निर्मितीसाठी  करता येतो. याशिवाय या क्षेत्रामधील उच्चशिक्षण आणि संशोधनाच्या संधी भारतात आणि भारताबाहेर उपलब्ध आहेत. यामध्ये भारतात प्रामुख्याने आयआयटी, आयआयएससी, आयसीटी, डीआरडीओ, एनसीएल, सीमेट या सारख्या संस्थामध्ये  तसेच भारताबाहेर अमेरिका, सिंगापुर, कॅनडा, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलियामधील नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात. 
सध्या कोरोना व्हायरसच्या  उपचारामध्ये आवश्यक असणाऱ्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स, टेस्टिंग अँड सॅमपलिंग किट्स अँड इतर वैद्यकीय साधनांमध्ये पॉलिमरचा वापर महत्वाचा ठरला आहे. 

पिंपरीकरांसाठी महत्वाची बातमी; आता 'हा' भाग केला 'सील'

प्रवेशाविषयी
पॉलिमर इंजिनिअरिंग हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये पीसीएम घेऊन जेईई व एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून सरकारी तसेच खाजगी महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये  प्रवेश घेता येऊ शकतो. 
पॉलिमर इंजिनिअरिंग ही शाखा दिवसेंदिवस विकसित होत आहे, त्यामुळे आपले जीवन अधिकाधिक सुसह्य होत आहे. या शाखेमध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या संधीचा पुरेपूर वापर करून प्रगतीची वाटचाल नक्कीच करता येऊ शकते. त्यासाठी पॉलिमर इंजिनिअरिंग या शाखेचा एक चांगली करिअर संधी म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  विचार करावा.  
-डॉ. मल्हारी कुलकर्णी (एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे)

loading image