धूमधडक्यात लग्न पडलं महागात! पुण्यात नवरदेवासह एकावर गुन्हा दाखल कारण...

Case File against Groom in Pune for Not maintaining Social Distance
Case File against Groom in Pune for Not maintaining Social Distance

वडगाव निंबाळकर( पुणे) : लग्न धुमधडाक्यात करताय? सावधान! बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी लग्नात सोशल डिस्टन्सिगचे नियम डावलून बेकायदेशीर डीजे वाजवल्याबाबत डिजे मालक आणि नवरदेवावर गुन्हा नोंदवला आहे.

सागर बाळासाहेब गायकवाड (मुळ गाव राजपुरेवस्ती मोढवे ता. बारामती सध्या रा. माळवाडी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या नवरदेवाचे नाव असून रणजित मिनानाथ देवकुळे (रा. धनकवडी- बालाजीनगर पुणे) असे डिजे मालकाचे नाव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवरदेव पुण्यात राहत असल्याने गावी मोढवे (ता. बारामती) येथे धुमधडाक्यात लग्न करण्याचे नियोजन शुक्रवारी (ता. 27) केले. केवळ औपचारीकता म्हणून आपल्या राहत्या घरी घरगुती पद्धतीने नातेवाईकांसह 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नासाठी परवानगी पोलिसांकडून घेतली होती. पण, नियमांची पायमल्ली करीत गुरूवारी(ता. 26) रात्री दहाच्या सुमारास गावातून डीजे साऊंड सिस्टिम आणि लाईटींग करीत मिरवणूक काढली. यामध्ये पुण्यातील मित्रपरिवारासह नातेवाईक सहभागी झाले.

कोणतेही सोशल डिस्टन्सिग न ठेवता एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा केला. इतरांच्या जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्याचा संभव असलेली हयगईची घातकी कृत्य केल्याबाबत नवरदेव आणि डिजे मालकावार गुन्हा दाखल केला. याकारवाईत पोलिसांनी सुमारे 4 लाख 50 हजार रूपये किंमतीचे डीजे साहित्य जप्त केले आहे. हवालदार ज्ञानेश्र्वर सानप यांनी फिर्याद नोंदवली आहे. सदरच्या कारवाईमुळे नियोजित लग्नाचा कार्यक्रम नियमांचे पालन करून पार पडला.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

''यापुढे पोलिस ठाणे हद्दीतील गावात लग्न किंवा इतर कार्यक्रम धुमधडाक्यात गर्दी जमवून करू नका नियमांची पायमल्ली कराल तर कारवाई होणारच''अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. 

स्वातंत्र्यानंतरचा शोध ठरला जागतिक 'माईलस्टोन'; देशातील तिसरे मानांकन GMRTला! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com