बेभान बाईक चालवणाऱ्यांकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की, गँगमध्ये तरूणीही होती सामील

Case Filed against five for Insulting the female police officer pune
Case Filed against five for Insulting the female police officer pune

पुणे : रस्त्याने वेडीवाकडी दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारास गाडी व्यवस्थित चालव, असे सांगणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना दुचाकीस्वार, त्याचे तीन साथीदार व एका महिलेने शिवीगाळ, धक्काबुक्की करीत त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पाच जणांविरुद्ध विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फिर्यादी या त्यांच्या सहकारी महिला पोलिस कर्मचाऱ्याची तब्येत ठीक नसल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. तेथून त्या रात्री नऊ वाजता परत येत असताना त्यांच्यासमोरुन वेड्यावाकड्या पद्धतीने दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वाराने फिर्यादीच्या गाडीला त्याची गाडी आडवी लावली. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्यासमवेतच्या सहकाऱ्याने त्यास जाब विचारीत गाडी सावकाश व व्यवस्थित चालविण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

काही वेळाने त्याचे साथीदार व एक महिला तेथे आली, त्यांनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांच्या सहकारी महिलेस शिवीगाळ करीत त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी आरोपींनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामामध्ये अडथळा आणला. तसेच सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com