उपराष्ट्रपतींविषयी आक्षेपार्ह पोस्ट...बारामतीतील अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक... 

मिलिंद संगई
Tuesday, 28 July 2020

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरून  आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती (पुणे) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरून  आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा वैभव सोलनकर यांनी दाखल केला आहे.

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...

फेसबुकवरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन ‌दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह भाषेत काही विधाने करण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी फिर्याद दिली आहे. पूजा झोळ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली असल्याचे वैभव सोलनकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 5050(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशाच्या उपराष्ट्रपतींबद्दल अत्यंत असभ्य भाषेत अशी पोस्ट करणे हा लोकशाहिचा अतिरेक म्हणावा लागेल. अशी भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, असे वैभव सोलनकर म्हणाले. दरम्यान, देशाच्या उपराष्ट्रपतींबद्दलच्या विधानाचा हा गुन्हा असल्याने आता पोलिस याबाबत काय भूमिका घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered in Baramati for posting an offensive Facebook post about Vice President