सनईच्या सुरात अक्षता पडणार...तोच पोलिसांची गाडी आली... 

किरण भदे
मंगळवार, 30 जून 2020

भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका लग्न समारंभात वधूवराला बोहल्यावर चढण्याआधी पोलिस ठाण्याची वारी करावी लागली.

नसरापूर (पुणे) : कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी लग्न समारंभाला फक्त 50 वरहाडींच्या उपस्थितीची परवानगी असताना जास्त वरहाडी उपस्थित राहिल्याने भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका लग्न समारंभात वधूवराला बोहल्यावर चढण्याआधी पोलिस ठाण्याची वारी करावी लागली. भोर तालुक्यात कोरोनोच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्यावेळी दाखल केलेला पहिला गुन्हा ठरला आहे. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

नसरापूर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या सभागृहामध्ये आज एका लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. वधूवरांच्या नातेवाईकांनी रितसर 50 नागकिकांच्या उपस्थितीची परवानगी काढली होती. मात्र, परवानगीपेक्षा जास्त वरहाडी लग्नास उपस्थित राहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, पोलिस हवालदार नितीन रावते, पोलिस नाईक सुधीर होळकर व गणेश लडकत यांनी सोहळ्यात जाऊन खात्री केली. त्यावेळी या सोहळ्याला १५० लोक उपस्थितीत असल्याचे व सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

याबाबत नसरापूरचे ग्रामविकास अधिकारी अभय निकम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार लाॅकडाउन नियमांचे उल्लंघन करून संसर्गजन्य रोग पसरविणेचे घातक कृत्य केल्याच्या कलमांसह महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना नियम २०२० चे नियम ११ सह साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम कलम २,३ व ४ प्रमाणे राजगड पोलिस ठाण्यात नवरा मुलगा व त्याचे आईवडील आणि नवरी मुलगी, तिचे अजोबा व काका, अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वर आणि वधूला लग्न लग्नापूर्वीच पोलिस ठाण्यात जावे लागले. त्यांच्या मागे नातेवाईक देखिल पोलिस ठाण्यात दाखल झाले. चूक झाल्याचे नातेवाईकांनी मान्य करून 50 लोकां मध्येच मोठ्या मंगल कार्यालयात लग्न लावतो, अशी ग्वाही दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

गर्दी न करण्याचा नियम सर्वांच्या हितासाठीच केलेला आहे, तरी देखिल त्याचे पालन होत नसल्यास पोलिसांना अशा प्रकारे कारवाई करणे भाग पडणार आहे. या पुढे नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी. गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांवर न्यायालयात कामकाज चालवून त्यांना या नियमभंगाचा दंड भरावा लागणार आहे.
 - दत्तात्रेय दराडे
सहायक पोलिस निरीक्षक, राजगड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered in Bhor taluka for crowding for a wedding ceremony