
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहे.
पुणे : तुम्ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करत आहात का?, तुम्हाला परीक्षेचा ताण आलाय? परीक्षेची तयारी कशी करावी, यासाठी टिप्स हव्यात का? तर मग सीबीएसईच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा आणि मार्गदर्शन मिळवा.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
होय, सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी टेलिफोनद्वारे समुपदेशनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना या सुविधेचा वापर करता येणार आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विकसित केलेल्या या हेल्पलाईनमध्ये प्रत्यक्ष संवादातून आणि मुद्रित ध्वनिफितीद्वारे अशा दोन प्रकारात समुपदेशन करण्यात येत आहे.
- 'राष्ट्रवादी'तर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांसोबत तज्ज्ञांसाठी सुवर्णसंधी!
विद्यार्थ्यांनी फोनद्वारे विचारलेल्या शंकांचे निरसन टेलिऑपरेर्टस्, 73 समुपदेशक आणि मुख्याध्यापक थेट हेल्पलाईनवरील कॉलद्वारे करणार आहेत. तसेच मंडळाच्या परदेशातील शाळांमध्ये परीक्षा घेण्यात येणार नसल्या तरीही जवळपास 21 मुख्याध्यापक आणि समुपदेशक हे देशाबाहेर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. यामध्ये ओमान, सिंगापूर, कतार, सौदी अरेबिया, जपान, नेपाळ, अमेरिका अशा देशांमधील मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे देखील समुपदेशन केली जात आहे.
- विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे विद्यापीठ 'अशी' घेणार तोंडी परीक्षा!
त्याशिवाय सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून मुद्रित ध्वनिफितीद्वारे समुपदेशन आणि आवश्यक माहितीही हेल्पलाईनद्वारे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध झाली आहे. मंडळाच्या या हेल्पलाईनद्वारे विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेची माहिती, परीक्षेची तयारी कशी करावी? मानसिक ताण कसा कमी करावा, या संदर्भातील माहिती घेऊ शकतात, असे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
- राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आमदारांनी काय सल्ला दिला? वाचा सविस्तर!
अशी असेल ही 'हेल्पलाइन'ची सुविधा
- समुपदेशनासाठी टोल-फ्री क्रमांक : 1800-11-8004
- वेळ : सकाळी 9.30 ते सायं. 5.30
- कालावधी : 15 जुलैपर्यंत
- हेल्पलाइन आठवड्यातील सातही दिवस सुरू असेल.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा