
कोंढवा (पुणे) : खडीमशिन चौकापासून मंतरवाडीपर्यंत महामार्गावरील सिमेंट कॅाक्रिटीकरणाचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. या अवजड वाहतुकीच्या मार्गावरील पिसोळी, उंड्री आणि हांडेवाडी येथे रस्त्याची कामे झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी ही दररोजची डोकेदुखी झाली आहे. खड्डयांमुळे नागरिकांचा जीवच धोक्यात आला आहे. रस्त्याचे काम करणा-या ठेकेदार कंपनीचे शासनाने बिल थकविल्याने ठेकेदाराने काम बंद केले आहे.
खडीमशिन चौकापासून मंतरवाडीपर्यंत महामार्गावर अवजड वाहतूक मोठया प्रमाणावर होते. नागरीकरण वाढले आहे, परंतु, रस्त्याचे काॅंक्रीटीकरण रखडल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. खडीमशिन चौकापासून मंतरवाडी चौकापर्यंत महामार्गाची सकाळ कडून पाहणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या नाहीत. रस्ता धोकादायक बनल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. खडीमशिन चौकापासून पिसोळीपर्यंत सिमेंट काॅंक्रटीकरणाचे काम झाले, परंतु पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाजवळ काम अर्धवट ठेवले आहे. पदमावती मंदिर ते जगदंब भवन चौकापर्यंत रस्त्यावरील खड्डयांमुळे रहिवाशांसह चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
जगदंब भवन चौकापासून पुढे काही अंतरापर्यंत काॅंक्रीटीकरण झाले आहे. मात्र, उंड्री चौकाच्या अलीकडे आणि पुढे काही अंतरापर्यंत काम रखडले आहे. या भागात खड्डे आणि अतिक्रमणांमुळे कोंडी होत आहे. उंड्रीपासून पुढे हांडेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे काम झाले, परंतु हांडेवाडी चौकाच्या पुढे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. तेथून ऊरूळी देवाची येथील कचरा डेपोच्या अलीकडे काही अंतरापर्यंत रस्त्याचे कॅांक्रिटीकरण झाले.
कचरा डेपोसमोर डांबरी रस्ता असून, त्यापुढे ऊरूळी देवाचीपर्यंत काम पुर्ण झाले आहे, परंतू मंतरवाडी चौकाजवळ काम रखडले आहे. खडीमशिन चौकापासून पिसोळीपर्यंत दुभाजक नाही. पदमावती मंदिराजवळ मोठे खड्डे पडले आहेत. येथे नुकत्याच झालेल्या एका अपघातात तरूणीला जीव गमवावा लागला, परंतु अजूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहत नाही, तसेच विजेअभावी रात्री खड्डे दिसत नाहीत.
उंड्री येथील रहिवासी चंद्रकांत दळवी म्हणाले, पिसोळी, उंड्री आणि हांडेवाडीत नवीन सोसायटयांमुळे नागरिकरण वाढल्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सेवा रस्त्याची गरज भासत आहे.
नागरिकांना खडडे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागतो. खड्डे तातडीने बुजवावेत. लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांनी सुरक्षित रस्त्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच अपेक्षा आहे.हवेली क्र. १ चे उपविभागीय अभियंता चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले, कामाचे बिल थकल्यामुळे ठेकेदाराने सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम थांबविले आहे. ते बिल अदा करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.