महत्त्वाची बातमी : रेशन कार्ड नसले तरी मिळणार ५ किलो तांदूळ, तोही मोफत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकूण 113 अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

पुणे : रेशन कार्ड नसलेल्या व्यक्तींनाही आता प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मे आणि जून या दोन महिन्यांचे धान्य वितरण लाभार्थ्यांना जून महिन्यापासून ऑफलाईन पध्द‍तीने करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांकडून त्यांचे आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याची पुराव्यादाखल स्वतंत्र नोंद करण्यात येईल.  

- पुणेकरांना जबर धक्का : दिवसभरातील रुग्णसंख्या पोहोचली तीनशेपर्यंत!

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकूण 113 अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याबाबत 22 मे रोजी आदेश पारित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 39 हजार 882 लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.

यासाठी संबंधित परिमंडल अधिकारी, तलाठी, स्थानिक नगरसेवक आणि अन्नधान्य वितरण केंद्रे यांच्यामार्फत विनारेशन कार्डधारकांना विहीत नमुन्यातील अर्ज वाटप केले जाणार आहेत. अर्ज नजिकच्या अन्नधान्य वितरण केंद्रात 30 मेपर्यंत जमा करायचे आहेत.

- 'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!

ज्या अन्नधान्य वितरण केंद्रामध्ये अर्ज भरुन देतील त्याच अन्नधान्य वितरण केंद्रातून संबंधित व्यक्तींना अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल. अन्नधान्य घेताना या अर्जाची पोच सोबत आणणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी आपले अर्ज 30 मे पर्यंत जमा करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.

- कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central government has decided to provide 5 kg rice free of cost to all