esakal | जेएनयूला केंद्र सरकार लक्ष्य करतंय : सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

The central government is targeting JNU Said Supriya Sule

काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे.

जेएनयूला केंद्र सरकार लक्ष्य करतंय : सुप्रिया सुळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''जेएनयूला केंद्र सरकार लक्ष्य करते आहे. शिक्षण प्रणालीसाठी हे दुर्देवी आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे, या घटनांमुळे देशाचे ऐक्य धोक्यात येतेयं, देशाचे नाव खराब होते आहे'', असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेएनयुमधील हल्ल्याबाबत व्यक्त करत जाहीर निषेध व्यक्त केला.

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हिपी) कार्यकर्त्यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यापूर्वी व्हॉट्सऍपवर 'हे' मेसेज व्हायरल

 ''आमचे दडपशाहीचे सरकार नाही, आम्ही आमची कामे करत राहू. विरोधकांनी दिलदारपणे आरोप करावे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी 5 वर्ष टीका करत राहावी, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.'' असे मत सुळे यांनी कर्जमाफीवरुन होणाऱ्या आरोपाबाबत व्यक्त केले. 
 

2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन


पाहा जेएनयूतील हल्ल्याबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे