JNU attack : जेएनयूतील हल्ल्यापूर्वी व्हॉट्सऍपवर 'हे' मेसेज व्हायरल

वृत्तसंस्था
Monday, 6 January 2020

या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हिपी) कार्यकर्त्यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गुंडांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यापूर्वी व्ह़ॉट्सऍपवर काही मेसेज व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जेएनयूमध्ये रविवारी रात्री गुंडांनी घुसून विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्यापूर्वी 'देशद्रोह्यांना झोडून काढा' असे आणि यासारखे काही मेसेज व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांवर काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. 

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

हिंसाचाराचे आवाहन करणाऱ्या सहा जणांपैकी तीन जणांच्या मोबाईलवरून व्हॉट्सऍपवर हे मेसेज पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 'एकदा आरपार करण्याची गरज आहे, त्यांना आता मारणार नाही तर कधी मारणार', 'लेफ्ट टेरर डाऊन डाऊन', 'त्या देशद्रोह्यांना मारून आनंद झाला' असे काही मेसेज व्हायरल झाल्याने हा हल्ला पूर्वनियोजित होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

#JNU : 'जेएनयू'मध्ये पुन्हा राडा; विद्यार्थी संघटनेची प्रमुख जखमी

या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हिपी) कार्यकर्त्यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असून लवकरच गुन्हे दाखल केले जातील असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. जामिया समन्वय समितीने (जेसीसी) देखील दिल्ली पोलिसांकडे विद्यापीठात धिंगाणा घालणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या गुंडांची ओळख पटवून त्यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

#JNUViolence : 'जेएनयू'ची धग पोचली पुण्यात; 'एफटीआयआय'समोर विद्यार्थ्यांची निदर्शने!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JNU attack Before mayhem WhatsApp chatter suggests planning