

Union Budget Allocates ₹517 Crore for Pune Metro Expansion
sakal
पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘पुणे मेट्रो’साठी ५१७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाला व विस्ताराला गती मिळणार आहे. हा निधी खडकवासला- हडपसर- खराडी - वाघोली या मार्गावरील मार्गिका व सध्या सुरू असलेल्या कामाकरिता वापरला जाणार आहे.