खडकवासला आरोग्य केंद्रातील कोरोनाबाधितांचे शतक पार

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 4 जुलै 2020

शहराच्या पश्चिमेला असलेल्या सिंहगड रस्त्यावरील खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे आज अखेर 112 कोरोनाचे रुग्ण आहेत. यातील 33 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 76 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

खडकवासला (पुणे) : शहराच्या पश्चिमेला असलेल्या सिंहगड रस्त्यावरील खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे आज अखेर 112 कोरोनाचे रुग्ण आहेत. यातील 33 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 76 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या 150 हुन अधिक जण होम क्वारंटाइन आहेत. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला व गोऱ्हे बुद्रुक ही गावे आहेत. या गावात सुमारे 80 हजार लोकसंख्या आहे.

 पेट्रोल- डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रात सर्वाधिक रुग्ण हे नऱ्हे गावामध्ये आहेत. नऱ्हे गावमध्ये आतापर्यंत 66 लोकांना कोरोना झालेला होता. यातील 26 रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत. एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे. तर सध्या गावातील 38 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यानंतर नांदेड गावामध्ये आतापर्यंत 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील त्यापैकी एक रुग्ण उपचार घेऊन घरी बरा झालेला आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 21 रुग्ण उपचार घेत आहेत.

कोंढापुरीत पर्यावराणासाठी झटताहेत ग्रामस्थ

किरकटवाडी, नांदेशी परिसरात 13 रुग्ण असून त्यातील चार जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नऊ जण उपचार घेत आहेत. खडकवासला गावात आतापर्यंत दहा रुग्ण कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दोन बरे होऊन घरी आलेले आहेत. आठ जणांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोरोनाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याचे एेकूनच आला हार्ट अॅटॅक

दोन रुग्णांचा मृत्यू 
नांदेड येथील 55 वर्षे महिलेचा समावेश होता. त्यांना मागील 20 वर्षांपासून दरम्यानचा आजार होता. तसेच वर्षभरापासून तिला मधुमेह हा आजार होता. या दोन्ही आजारामुळे रुग्णालयात दाखल होताच तातडीने तिला अतिदक्षता विभागात 14 दिवस उपचार करण्यात आले. नऱ्हे येथील मृत्यू झालेल्या रुग्णाचे वय 59 वर्ष होत. त्याला रक्तदाब आणि मधुमेह असे दोन्ही आजार होते. 

त्रिसूत्री राबवा 
शहरालगत असल्यामुळे नऱ्हे गावात जास्त रुग्ण  आढळत आहेत. येथे मास्क वापरणे, कामांसाठी बाहेर जाणाऱ्यांनी हाइड्रोक्सी क्लोरोक्वीन या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. 60 वर्षावरील नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी करावी. या त्रिसूत्री राबविली पाहिजेत. मास्क न वापरणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने दंड आकारावा. असे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centuries passed by corona patients at Khadakwasla Health Center