

पुणे : पुण्यात मॉन्सूनच्या आधी उन्हाची काहिली वाढल्यानंतर वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या वळिवाच्या पावसाने शतक पार केले आहे. शहरात नऊ मेपासून वळिवाला सुरुवात झाली. गेल्या ११ दिवसांमध्ये पुण्यात शिवाजीनगर येथे १०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
उद्या (ता. २१) सुद्धा शहर आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शहरात सोमवारी सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. शिवाजीनगर येथे कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
यात रविवारच्या तुलनेत २.१ अंश सेल्सिअसने इतकी वाढ झाली. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाली. त्यानंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहराच्या बहुतांश भागाला झोडपले. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, पाषाण येथे पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहू लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.