चिंताजनक : राज्यात फक्त ३५ तालुक्यातच सीईटीची परीक्षा शक्य

CET examination is possible only in 35 taluka In the state
CET examination is possible only in 35 taluka In the state

पुणे : कोरोनामुळे अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी)  जिल्हांसह तालुकास्तरावर घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी केवळ ३० ते ३५ तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये 'सीईटी'साठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा तरी तालुकास्तरावरील परीक्षेचा प्रयत्न पूर्ण सफल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

सीईटी सेलतर्फे उच्च व तंत्र शिक्षणाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. या परीक्षांसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थी अर्ज दाखल करतात. यंदा कोरोना मुळे या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. आतापर्यंत दोन वेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. दरम्यान, अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी या अभ्यासक्रमासाठी राज्यातून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षा देतात. कोरोना मुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व सोशल डिस्टन्सचा विचार करून परीक्षा केंद्र वाढविण्यावर तंत्रशिक्षण विभाग, सीईटी सेल मध्ये चर्चा करण्यात आली. तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या सोईसाठी यंदा तालुकास्तरावरही सीईटीची परीक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
तंत्रशिक्षण विभाग आणि सीईटी सेलने राज्यातील तालुक्यांमध्ये आॅनलाईन सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यासाठी माहिती संकलीत करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभागीय तंत्र शिक्षण संचालक कार्यालयाला देण्यात आले होते. त्यानुसार सर्वेक्षण करून कोणत्या तालुक्या काय स्थिती आहे याची माहिती घेऊन ती सादर करण्यात आली. आॅनलाईन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या संगणक लॅब मोजक्याच तालुक्यात उपलब्ध असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे, असे एका अधिकार्याने सांगितले. 

पुरंदर तालुका 30 वर; पुन्हा मुंबई - पुणे कनेक्शनमधूनच धोका वाढतोय

चांगल्या दर्जाचे संगणक आवश्यक
राज्यातील ३५८ तालुक्यातील माहिती संकलित केल्यानंतर त्याचे विश्लेषण करण्यात आले. त्यातील बहुतांश तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये संगणक असेल तरी ते चांगल्या दर्जाचे नाहीत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सायबर सुरक्षा अशा पायाभूत सुविधा नाहीत. राज्यातील ३० ते ३५ तालुक्यातील महाविद्यालयात चांगल्या लॅब उपलब्ध आहेत. तेथे परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. हे तालुके प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, तर विदर्भ व मराठवाड्यातील प्रमाण खुप कमी आहे. त्यामुळे इतर ठिकाणी यंदाची 'सीईटी' जिल्हा स्तरावरच घ्यावी लागतील अशी स्थिती आहे, असे सुत्रांनी सांगितले. 

श्रीनिवास पाटील यांच्या लोकसभेतील उपस्थितीबाबत महत्त्वाचा खुलासा​

आव्हानात्मक स्थिती 
जिल्हा स्तरावर चांगल्या लॅब उपलब्ध आहेत, पण कोरोना मुळे तालुकास्तरावर परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदा पुरेसे तालुके उपलब्ध झाले नसल्याने आव्हानात्मक स्थितीत परीक्षा पार पाडावी लागणार आहे. त्यातच सोमवारी पुन्हा एकदा सीईटीची परीक्षा पुढे ढकलल्याने उपलब्ध लॅबमध्ये व्यवस्थीत नियोजन करावे लागणार आहे. 

न्यायव्यवस्था आली धावून, अपघातग्रस्त दांपत्याला मिळाला आधार 

- राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये सीईटी परीक्षा केंद्र
- ३० ते ३५ तालुक्यात नवे केंद्र सुरू होण्याची शक्यता
- इतर तालुक्यात ऑनलाईन परीक्षेसाठी पायाभूत सुविधेचा अभाव
- एमएमएचटी सीईटीसाठी ४ लाख ४५ हजार अर्ज दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com