
खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांची आपला आपला विवाह अत्यंत साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करत आदर्श तर ठेवलाच, पण लग्नसोहळा पार पडल्यावर काही वेळातच ते कोरोना रोखण्यासाठीच्या कामांकरिता तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी बाहेर पडले.
चास (पुणे) : राजकारणात माणूस आला की कोणताही कार्यक्रम करायचा म्हणटल की, त्याचा डामडौल झालाच पाहिजे, मोठेपणा दाखवता आलाच पाहिजे, अशी भावना असते. मात्र, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांची आपला आपला विवाह अत्यंत साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करत आदर्श तर ठेवलाच, पण लग्नसोहळा पार पडल्यावर काही वेळातच ते कोरोना रोखण्यासाठीच्या कामांकरिता तालुक्याच्या सुरक्षिततेसाठी बाहेर पडले.
- काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार
खेड पंचायत समीतीचे सभापती अंकुश राक्षे यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी जुन्नर येथील डोंगरे परिवारातील वसुधा यांच्याशी ठरला होता. लग्नाची तारीखही ठरली होती, पण कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला व सभापतींनी आपल्या व्यग्र कार्यक्रमामुळे विवाह पुढे ढकलला. गेल्या काही महिन्यांपासून राक्षे यांनी तालुक्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिवस रात्र गावोगावी फिरून जनजागृती करत कोरोना योद्ध्य़ाप्रमाणे काम केले व या विषाणुचा फैलाव तालुक्यात वाढू दिला नाही.
- आधीच कडकी त्यात इंधन दरवाढीने भरतीय धडकी; सलग बाराव्या दिवशी इंधन दरवाढ
मात्र, ठरलेला विवाह पार पाडण्यासाठी त्यांनी दोन्ही परिवारातील मोजकीच माणसे व मोजक्याच मित्र परिवाराच्या साक्षिने सोमवारी सोशल डिस्टंन्सिंग पाळत कोणताही गाजावाजा न करता आपला विवाह सोहळा पार पाडला. कोरोनाचे सावट असताना मास्क, सॅनिटायझर, टनेल यांसह सर्व सोपस्कर पार पाडत विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला.
विशेष बाब म्हणजे कोरोनाचे सावट आल्यापासून राक्षे यांनी तालुक्यात रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून गावोगावी जनजागृती केली, आयसोलेशन वार्ड, रूग्णांना अॅडमीट करण्यासाठी आवश्यक ते सहकार्याबरोबरच त्यांच्या नेण्याआणण्यासाठी विशेष योगदान दिले. तसेच, मध्यंतरी आलेल्या चक्रिवादऴातही नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून मदतीचा हात पुढे केला. अशात लग्नसोहळा संप्पन्न होताच सभापती तातडीने कोरोनाच्या लढाईत सामील झाले.