esakal | पिंपरी-चिंचवडमधील मृत्यूदर कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Death-Rate

पिंपरी शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ५७ हजारांपर्यंत पोचली आहे. रुग्णवाढीचा वेग बघता आणखी भर पडणार आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाणही कमी व्हायला तयार नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ९५० पर्यंत पोचली आहे. हा मृत्यूदर १.७ ते १.८ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिला आहे. तो राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने कमी असला तरी एक टक्‍क्‍यापर्यंत खाली आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मृत्यूदर कमी करण्याचे प्रशासनापुढे आव्हान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ५७ हजारांपर्यंत पोचली आहे. रुग्णवाढीचा वेग बघता आणखी भर पडणार आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाणही कमी व्हायला तयार नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ९५० पर्यंत पोचली आहे. हा मृत्यूदर १.७ ते १.८ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिला आहे. तो राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने कमी असला तरी एक टक्‍क्‍यापर्यंत खाली आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील १४ जणांची तपासणी केली जात आहे. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी तपासणीचे प्रमाण २० व्यक्तींपर्यंत नेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, काही जण भीतीपोटी तपासणीसाठी येत नाहीत किंवा नकार देतात. 

कोरोनामुळे भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; तज्ज्ञ म्हणताहेत...

तपासणी केली तरी चुकीचा पत्ता, संपर्क क्रमांक देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे दिसून आले आहे. असे प्रकार संसर्ग वाढीसाठी घातक ठरू शकतात. शिवाय, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालनही अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. तसेच, लॉकडाउन शिथिल झाल्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. 

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

मृत्यूची कारणे 
कोरोनामुळे रुग्ण होत असला तरी ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे; फुफ्फुस, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार असलेले; प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही तास अगोदर रुग्णालयात दाखल होणारे अशांचा मृत्यू झाल्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. निव्वळ कोरोनामुळे पाच टक्के मृत्यू होत असल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. 

शहरातील मृत्युदर कमी करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण व ऑक्‍सिजन बेडची संख्या वाढवली आहे. व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. नागरिकांनीही आजार अंगावर काढू नये, शंका आल्यास स्वतःहून तपासणी करून घ्यावी. शरीरातील ऑक्‍सिजन पातळी कमी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Edited By - Prashant Patil