esakal | कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्याचे बारामतीपुढे आव्हान!
sakal

बोलून बातमी शोधा

 challenges to reduce corona mortality in Baramati

''मृत्यू होणाऱ्या कोरोनाग्रस्तांना इतर व्याधी असल्या तरी ते कोरोनाग्रस्त होते ही बाब सध्या अधोरेखीत करणारी ठरत आहे. या सर्वच मृत्यूंचा बारकाईने अभ्यास होणे गरजेचे आहे. अनेकदा रुग्णाने दुखणे अंगावर काढणे हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे,'' अशा स्थितीत वेळेत निदान होऊन उपचार मिळणे ही बाब गरजेची आहे. 

कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्याचे बारामतीपुढे आव्हान!

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : बारामती शहरातील कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आता ठोस उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या कमी होणे हे चांगले लक्षण असले तरी एकूण रुग्ण संख्येच्या दहा टक्क्यांपर्यंत असलेला मृत्यू दर शून्यावर आणणे गरजेचे आहे. 

''मृत्यू होणाऱ्या कोरोनाग्रस्तांना इतर व्याधी असल्या तरी ते कोरोनाग्रस्त होते ही बाब सध्या अधोरेखीत करणारी ठरत आहे. या सर्वच मृत्यूंचा बारकाईने अभ्यास होणे गरजेचे आहे. अनेकदा रुग्णाने दुखणे अंगावर काढणे हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे,'' अशा स्थितीत वेळेत निदान होऊन उपचार मिळणे ही बाब गरजेची आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामतीतील रुग्णांची संख्या 130 वर जाऊन पोहोचली असून 12 मृत्यू हे प्रमाण जवळपास दहा टक्क्यांच्या घरात आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 62 इतकी होती, बरे झालेले रुग्ण एकूण रूग्ण संख्येतून वजा केले तर मृत्यू दर आणखी वाढतो. त्या मुळे आता बारामतीकरांना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

बारामती शहर व तालुक्यात या साठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असून प्रशासनाने प्रसिध्दी माध्यमांसह इतरही माध्यमातून काहीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. 

हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​

 प्रशासन प्रयत्नशील...
''कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे प्रशासनानेही मान्य केले आहे. या साठी आता प्रभावी उपाययोजना करण्याचे नियोजन सुरु झाले आहे. आजपर्यंत झालेल्या प्रत्येक मृत्यूचा अभ्यास केला जाईल. रुग्णांनी प्राथमिक लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे''
- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती. 


ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​