'त्या' बहाद्दरानं चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मारलं शतक; पोलिसांनी त्याला पुन्हा ठोकल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

राजू बाबूराव जावळकर (वय 55, रा खानापूर, सिंहगड रोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून ट्रक, टेम्पो आणि दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे.

पुणे : चोरीच्या गुन्ह्यांत नामचिन असलेल्या गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा 1984 पासून गुन्हेगारीत असून आत्तापर्यंत त्याने 100 हून अधिक ठिकाणी हात साफसफाई केली आहे.

'तो' गोट्याला भेटला म्हणून छोट्याने 'त्याची' तीन बोटे छाटली

राजू बाबूराव जावळकर (वय 55, रा खानापूर, सिंहगड रोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून ट्रक, टेम्पो आणि दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसांपूर्वी टेम्पो चोरीला गेला होता. त्याचा सीसीटीव्हीवरुन शोध घेत असताना पोलिस नाईक तुषार भिवरकर आणि शिपाई विक्रांत सासवडकर यांना जावळकर हा खेड शिवापूर टोलनाक्‍यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.

मराठा संघटनांंनी राज्य सरकारवर फोडलं खापर; आरक्षणाच्या स्थगितीबाबत दिल्या 'या' प्रतिक्रिया

त्याकडे तपास केल्यावर त्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहन चोरीच्या सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जावळकर याच्या अटकेची कामगिरी खटके यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश पासलकर, सहायक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक सचिन जाधव, हवालदार अजित धुमाळ, तुषार भिवरकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अतुल जाधव यांनी केली.

विनामास्क फिरणारे नागरिक पोलिसांच्या रडारवर; आठवडाभरात 'इतक्या' पुणेकरांवर झाली कारवाई

चोरलेले वाहन तोडून भंगारात विकत :
जावळकर हा प्रामुख्याने दुचाकी, टेम्पो, पिकऍपची चोरी करायचा. वाहन चोरल्यानंतर त्या वाहनांचे भाग तोडून ते भंगार विक्रेत्यांना विकायचा. तर इंजिनावरील नंबर खोडून पुरावा नष्ट करायचा. चंदननगर, खडक, वारजे येथील चार टेम्पो चोरून त्याने ते दिनेश रामसिंग वसावा (वय 24, रा. गुजरात) या भंगार विक्रेत्याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या गाड्यांचे इंजिन पुराव्याकामी जप्त केले आहे.

जावळकर हा 1984 पासून चोऱ्या करीत आहे. त्याने केलेले सुमारे 95 गुन्हे आतापर्यंत वेगवेगळ्या वेळी उघडकीस आले आहेत. त्यातील काही गुन्ह्यांत त्याला शिक्षाही झाली आहे. देशात लॉकडाऊन सुरू झाला त्याच दिवशी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता. अनलॉक सुरू होताच त्याने पुन्हा चोऱ्या सुरू केल्या.
- शंकर खटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलिस ठाणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandannagar police have arrested theft who has scored more than 100 crimes