Chandrakant Patil
Chandrakant PatilChandrakant Patil

पाटील म्हणाले, शिवसेना सोयीनुसार सावरकर प्रेम व्यक्त करते, कारण...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : महाविकास आघाडीसोबत सत्तेत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊच शकत नाही. कारण, तिघांनी एकत्रित येऊन ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ ठरवला आहे. त्यानुसार एकमेकांच्या निष्ठांना धक्का लागू नये, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केली तर त्यांना चालते. परंतु, सावरकरांमुळे शिवसेना सोडून इतर दोन पक्षांच्या निष्ठा, मन दुखावणार असेल तर सावरकर प्रेम जाहीर करायचं नाही, हे त्यांनी ठरवलेले आहे. सोयीनुसार शिवसेना सावरकर प्रेम व्यक्त करते, असा टोला भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लगावला.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेनेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला.

Chandrakant Patil
भाजपमध्ये गटबाजी : वसुंधरा राजे करणार शक्तिप्रदर्शन; पुनिया कॅम्प निशाण्यावर?

चंद्रकांत पाटील हे शनिवारी (ता. २६) पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे माध्यमांशी बोलत होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचे जमीन खरेदी-विक्रीसंदर्भातील पुराव्यांच्या आधारे नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयानेही नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे एकप्रकारे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना पाठीशी घालण्याचाच प्रकार आहे, असेही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले.

घटनात्मक दृष्ट्या एखाद्या सरकारी नोकरदाराला अटक झाल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचे निलंबन करायचे असते. तसेच चार्टशीट दाखल झाल्यानंतर सेवेतून बडतर्फ करावे लागते. त्यानुसार मंत्र्याच्या अटकेनंतर ही प्रक्रिया का राबवली जात नाही. मंत्रालयाच्या आवारात किंवा आसपासच्या परिसरात मराठा समाजबांधवांना, ओबीसी राजकीय आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करू इच्छिणाऱ्यांना आंदोलनास परवानगी नाही. दुसरीकडे नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्याचे अख्खं मंत्रिमंडळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. त्यामुळे या आंदोलनास कोणी परवानगी दिली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले.

Chandrakant Patil
संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या

शिवसेनेने विचार केला पाहिजे

संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेने (shiv sena) तातडीने घेतला. परंतु, नवाब मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शिवसेनेने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com