esakal | 'राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देणार की, कॅडबरी?' 
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil reaction after eknath khadse joins ncp

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'भाजपमध्ये अन्याय झाला असं खडसे म्हणतायत. त्यातून काही तरी मार्ग निघाला असता.'

'राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देणार की, कॅडबरी?' 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : खान्देशातील भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. तेव्हापासूनच भाजपमधील नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करू लागले होते. यात, रावसाहेब दानवे यांचाही समावेश होता. आज, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. 

आणखी वाचा - राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे काय म्हणाले?

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'भाजपमध्ये अन्याय झाला असं खडसे म्हणतायत. त्यातून काही तरी मार्ग निघाला असता. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना काय देतात हे पाहूया. एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश दुपारी दोन वाजता होता. तो का लांबला? काय द्यायचं अजून ठरलं नाही? राष्ट्रवादीचे नेते 'समाधान होईल असं देऊ' एवढचं खडसेंना म्हणाले आहेत. आता समाधान ही वेगळी गोष्ट आहे. समाधान लिमलेटच्या गोळीमध्येही असतं. तेवढी गोळी देऊन, तुमचं समाधान झालं पाहिजे असंही म्हणता येते. आता राष्ट्रवादी त्यांना लिमलेट देतात की कॅडबरी हे पाहूया आणि खडसे समाधानी होतात की, आता काही पर्याय नाही, जे दिलंय त्यात समाधान मानून घेतात हे बघावं लागेल.'

आणखी वाचा - 40 वर्षांनंतर खडसेंचे सिमोल्लंघन!

दरम्यान, 40 वर्षे भाजपमध्ये काम केल्यानंतर आज, एकनाथ खडसे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या कार्यालयात निवडक समर्थकांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचे सांगून, खडसे यांनी भाजपला धक्का दिला होता. आज त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

loading image