काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

महाराष्ट्रात सध्या पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक १० रुग्ण आहेत. तसेच शेजारील पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना संशयितांची संख्या वाढू लागली आहे.

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी कार्यालयीन कामानिमित्तच कार्यालयात यावे. कामाशी संबंध नसलेल्या व्यक्‍तींना सोबत आणून गर्दी करू नये. तसेच कार्यालयात कामाशिवाय जास्त वेळ थांबू नये, असे निर्देश धर्मादाय सह आयुक्‍त दिलीप देशमुख यांनी दिले आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. धर्मादाय सह आयुक्‍त कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी दर्शनी भागात सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. त्याचा नागरिकांनी वापर करून स्वत:चे हात निर्जंतुकीकरण करावेत. हस्तांदोलन टाळावे. त्याऐवजी नमस्कार करावा.

- शरद पवारांच्या शब्दाचं वजन पाहा; एका पत्रावर 'या' नेत्याची नजरकैदेतून सुटका

कार्यालयात कोणत्याही कर्मचाऱ्यांशी कामापुरतेच संभाषण करावे. संभाषणादरम्यान दोन व्यक्‍तींमध्ये योग्य अंतर राखावे. सर्दी, ताप आणि खोकला असलेल्या व्यक्‍तींनी संसर्ग होऊ नये, यासाठी रुमाल आणि मास्कचा वापर करावा. 

- खुशखबरः नोकरभरती ऑफलाईनच, मुख्यमंत्र्यांचा रोहित पवारांना शब्द

स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करावी 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातील धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना धर्मादाय सह आयुक्‍त देशमुख यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक पावले उचलण्यास सुरवात केली. पत्रकार परिषद घेत त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

- कोरोनाची दहशत गुगलला; वर्क फ्रॉम होमच्या सूचना 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

महाराष्ट्रात सध्या पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक १० रुग्ण आहेत. तसेच शेजारील पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना संशयितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे या दोन शहरातील शाळांना सक्तीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर या राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील थिएटर्स, जीम, स्वीमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. मात्र, रेल्वे आणि बससेवा या सुरू राहणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charity commissioner Dilip Deshmukh declared a special announcement about Coronavirus and Pune citizens