पिंपळवंडी येथे मांजराचा पाठलाग करताना बिबट्या घुसला घरात

पिंपळवंडी परिसरात बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला असुन पाळीव प्राण्यांवर सतत हल्ले होत असुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बिबट्या
बिबट्या sakal

पिंपळवंडी : पिंपळवंडी(ता.जुन्नर) येथील सदगुरु नगर येथे मांजराचा पाठलाग करताना शुक्रवारी(ता.२४) रात्री नऊच्या सुमारास बिबट्या घरात घुसला सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.येथील विशाल लक्ष्मण फुलसुंदर यांच्या घरात रात्री नऊच्या सुमारास मांजराचा पाठलाग करत असलेला बिबट्या घुसला.घराच्या बाजुच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने त्याने घरातुन धुम ठोकली.

विशाल फुलसुंदर यांचे घर पुणे नाशिक महामार्गाच्या जवळच असुन ते कुटुंबातील सदस्यां सोबत घरा मध्येच होते.त्यांचा बारा वर्षांचा मुलगा राज हा हॉल मध्ये बसला होता.रात्री नऊच्या वेळी एक बिबट्या मांजराचा पाठलाग करत मांजरा पाठोपाठ त्यांच्या घरात घुसला बिबट्याला पाहुन राज आरडा ओरडा करत वडीलांकांडे पळाला. घराच्या बाहेरील नागरिकांनी केलेला आवाज व राजने प्रसंगावधान राखत वडिलांकडे घेतलेली धाव यामुळे बिबट्याने भयभीत होऊन घरातुन पळ काढला. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

बिबट्या
मोदींच्या भेटीत बायडेन यांनी काढली महात्मा गांधींची आठवण; म्हणाले, 'गांधींजी...'

त्यानंतर विशाल फुलसुंदर व नागरिकांनी बिबट्या ज्या दिशेला गेला त्याठिकाणी बॅटरी लाऊन पाहिले असता बिबट्या घराच्या जवळच असलेल्या आंब्याच्या झाडावर त्यांना दिसला. सदर घटनेची माहिती त्यांनी वनविभागाला कळवली असुन हि घटना घडल्या नंतर कुटुंबातील सदस्य भयभीत झाले आहेत लवकरात लवकर वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी विशाल फुलसुंदर यांनी केली.

पिंपळवंडी परिसरात बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढलेला असुन पाळीव प्राण्यांवर सतत हल्ले होत असुन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात राहनाऱ्या नागरिकां मध्ये बिबट्याची भीती जास्त प्रमाणात आहे. पिंपळवंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य सतीश काकडे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com