हडपसर : आठव्या फेरीअखेर चेतन तुपेंनी मारली बाजी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

 Election Results 2019 : हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना उमेदवार योगेश टिळेकर आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. चेतन तुपे यांनी सातव्या आणि आठव्या फेरीत चांगली आघाडी घेतली आहे. सातव्या फेरीत तुपे यांनी 3101 मतांची आघाडी घेतली.

Vidhan Sabha 2019 :  पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना उमेदवार योगेश टिळेकर आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार चेतन तुपे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. चेतन तुपे यांनी सातव्या आणि आठव्या फेरीत चांगली आघाडी घेतली आहे. सातव्या फेरीत तुपे यांनी 3101 मतांची आघाडी घेतली. तसेच चौथ्या फेरीत तुपे 1683 मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे तुपे यांनी आठव्या फेरीअखेर 2 हजार 573 मतांची आघाडी घेतली आहे.
हडपसर : योगेश टिळेकर यांची तुपेंवर आघाडी  

हडपसर विधानसभा मतदारसंघ : उमेदवारांना मिळालेली मते 
सातवी फेरी
चेतन तुपे (आघाडी) - 7 हजार 481 
योगेश टिळेकर (युती) - 4 हजार 380 

आठवी फेरी
चेतन तुपे (आघाडी) - 4 हजार 777 
योगेश टिळेकर (युती) - 3 हजार 94

हडपसर : चौथ्या फेरीत टिळेकरांची आघाडी कमी करण्यात तुपेंना यश
टिळेकर यांनी पहिल्या-दुसऱ्या आणि पाचव्या-सहाव्या फेरीत आघाडी घेतली. तर, तुपे यांना दुसऱ्या आणि चौथ्या फेरीत आघाडी मिळाली. सहाव्या फेरीअखेर टिळेकर आघाडीवर आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chetan tupe Leads in hadapsar for Maharashtra Vidhan Sabha 2019