हडपसर : योगेश टिळेकर यांची तुपेंवर आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

Election Results 2019 : पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघात मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत भाजप- शिवसेनेचे उमेदवार योगेश टिळेकर आघाडीवर आहेत. टिळेकर यांना 4 हजार 278 मते मिळाली आहेत. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांना 4 हजार 94 मते मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांना 1091 मते मिळाली असून, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Vidhan Sabha 2019 : पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघात मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत भाजप- शिवसेनेचे उमेदवार योगेश टिळेकर आघाडीवर आहेत. टिळेकर यांना 4 हजार 278 मते मिळाली आहेत. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांना 4 हजार 94 मते मिळाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांना 1091 मते मिळाली असून, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019 

भाजप उमेदवाराला शिवसेनेची नेमकी किती मदत झाली, वंचित बहुजन आघाडीने कोणाची मते घेतली आणि जातीय समीकरणे यावरच आज उमेदवाराचा विजय ठरणार आहे.  शिवसेनेचीही या मतदारसंघात चांगली ताकद आहे. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर हे गेल्या 2014 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. युतीच्या जागा वाटपात या जागेसाठी शिवसेनेने आग्रह धरला होता. मात्र, भाजपने शहरातील आठही विद्यमान आमदारांना युतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. शिवसेनेसाठी एकही मतदारसंघ सोडला नाही. त्यामुळे, हडपसर मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019

या मतदारसंघात हडपसर, कोंढवा, कात्रज, मांजरी, केशवनगर, टिळेकरनगर, माळवाडी, सय्यदनगर, रामटेकडी, वानवडी, कौसरबाग असा भाग येतो. मतदारांची संख्या पाच लाख चार हजार 44 इतकी आहे. त्यापैकी दोन लाख 38 हजार 170 (47.25 टक्‍के) मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. परंतु मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला, हे आज स्पष्ट होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogesh Tilekar Leads in hadapsar for Maharashtra Vidhan Sabha 2019