पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या छोटा राजनच्या पुतणीला अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.
crime
crimeSakal Media

पुणे ः कौटुंबिक वादासंदर्भातील तक्रार मागे घेण्यासाठी तसेच पत्नीला घटस्फोट देण्यासाठी छोटा राजनच्या पुतणीने बांधकाम व्यावसायिकास "मी छोटा राजनची पुतणी आहे' अशी धमकी देत 50 लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणामध्ये वर्षभर फरारी असलेल्या छोटा राजनच्या पुतणीला अखेर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

crime
पुणे शहरात वादळीवारा व पावसामुळे दोन दिवसात 55 झाडे कोसळली

प्रियदर्शीनी प्रकाश निकाळजे (वय 39, रा. जांभुळकर चौक, वानवडी) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर यापुर्वी धीरज बाळासाहेब साबळे (वय 26, रा. धानोरे, खेड), मंदार सुरेश वाईकर (वय 41, रा. बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कात्रज येथे राहणाऱ्या 48 वर्षीय व्यक्तीने मार्च 2020 रोजी खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. फिर्यादी व त्यांच्या पत्नीची कौटुंबिक कारणातून भांडणे झाली होती. त्या दोघांच्या घटस्फोटावरून पत्नी व मेव्हणीचा फिर्यादीशी वाद होता. दरम्यान, फिर्यादीची पत्नी व मेव्हणीची मंदार वाईकर याच्याशी ओळख झाली. त्यानंतर वाईकरने या प्रकरणात प्रिदर्शीनी निकाळजे मध्यस्थी करेल, असे सांगितले. त्यानंतर निकाळजे, वाईकर व साबळे या तिघांनी संगनमत करून निकाळजे हिने तिच्या संघटनेच्या लेटर हेडवर फिर्यादीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्या अर्जानुसार, गुन्हा दाखल होऊ नये व प्रकरण मिटवून घेण्यासाठी निकाळजे हिने फिर्यादीकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर तिने फिर्यादीस पिस्तुलाचा धाक दाखवून "मी छोटा राजनची सख्खी पुतणी आहे. आमचा डिएनए एकच आहे.जीव प्यारा असेल तर मला पैसे पोहोच झाले पाहीजेत. नाहीतर पिस्तुलातील दहाच्या दहा गोळ्या घालीन' अशी धमकी दिली होती.

crime
म्युकरमायकोसिसचे पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ रुग्ण

या घटनेनंतर फिर्यादीने घाबरून 25 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, 14 मार्च 2020 रोजी लष्कर परिसरातील हॉटेल अरोराच्या परिसरात साबळे हा पैसे स्विकारण्यासाठी आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्यापाठोपाठ पोलिसांनी वाईकरलाही बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान, या घटनेनंतर निकाळजे हि पोलिसांना वर्षभरापासून गुंगारा देत होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तिला मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अटक केली. तिला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ऍड.संतोषकुमार पटाळे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली.

crime
पुणे शहरात साडे सात हजार डोस गेले वाया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com