esakal | ... म्हणून रविवारीच पुणेकरांनी केला आखाड साजरा!
sakal

बोलून बातमी शोधा

Aakhad_Party

पुढील दहा दिवस लॉकडाउन असल्यामुळे साठा करण्याकडेही नागरिकांचा कल होता. त्यामुळे मटन, चिकन आणि मासळीच्या दरात सुमारे 20 टक्के वाढ झाली होती.

... म्हणून रविवारीच पुणेकरांनी केला आखाड साजरा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आखाड संपण्यास अवघे नऊ दिवस राहिल्यामुळे आणि सोमवारपासूनच दहा दिवसांचा लॉकडाउन असल्यामुळे सामिष शौकिणांनी रविवारीच (ता.१२) आखाड साजरा केला. शहरातून सुमारे 750 टन चिकन फस्त झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. मटन आणि मासळीलाही आज मोठा उठाव होता.

'ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच गायकवाड यांची बदली'; काँग्रेसने केली टीका​

आखाड 20 जुलै रोजी संपत असून 21 जुलै पासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. त्यातच पुण्यात 13 जुलै रोजी मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत कोरानामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तुलनेने आज वातावरण शिथिल होते. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत शहरात आज घरोघरी आखाडचा शेवटचा रविवार असल्यासारखाच बेत होता. मटन आणि चिकनचे तयार खाद्यपदार्थ करणाऱ्यांनाही मोठी मागणी होती. काहींनी पावसाळी वातावरणात संधीचा फायदा धुंद होत मटन, चिकन, मासळीचा आस्वाद घेतला.

- पुणेकरांनो, उद्या दिवसभर दुकाने खुली राहणार, मात्र...

कोरोनामुळे सुरवातीच्या टप्प्यात चिकन, मटनाला मागणी कमी होती. परंतु, लॉकडाउन शिथिल होत गेला, त्या प्रमाणात त्यांची मागणी वाढत गेली, असे चिकनचे व्यापारी रुपेश परदेशी आणि मटन व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी सांगितले. पुढील दहा दिवस लॉकडाउन असल्यामुळे साठा करण्याकडेही नागरिकांचा कल होता. त्यामुळे मटन, चिकन आणि मासळीच्या दरात सुमारे 20 टक्के वाढ झाली होती. मटनाचे दर सुमारे 600 ते 640 रुपये प्रती किलोच्या आसपास होते तर, चिकनचे दर 200 ते 250 रुपये किलोच्या आसपास होते.

'राजभवनात कोरोना, अमिताभजींना कोरोना' असं म्हणत सामंतांनी UGCला लावला टोला!​

मार्केट यार्ड बाजारात आंध्रप्रदेश तसेच देशाच्या पूर्व किनारपट्टीवरून मासळी आवक होत आहे. लॉकडाउन जाहीर झाल्याने खाडी तसेच नदीच्या मासळीची आवक झाली नाही. आखाडामुळे मासळीला रविवारी मोठी मागणी होती. बाजारात दाखल मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने भावात सुमारे वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या आठवड्याच्या तुलनेत गावरान अंड्याच्या भावात शेकड्यामागे 70 रुपयांनी तर इंग्लिश अंड्याच्या भावात 10 रुपयांनी घट झाली आहे. रविवारी शहरात खोल समद्रातील मासळीची 5 ते 6 टन, तर आंध्र प्रदेश येथून रोहू, कतला, सिलन आदी मासळीची 4 ते 5 टनांची आवक झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top