esakal | 'ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच गायकवाड यांची बदली'; काँग्रेसने केली टीका
sakal

बोलून बातमी शोधा

IAS_Shekhar_Gaikwad

टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल करताना त्यांनी केलेल्या नियोजनामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू लागली होती. कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांनी एका सैनिकाप्रमाणे काम केले.

'ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच गायकवाड यांची बदली'; काँग्रेसने केली टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर न झाल्यामुळेच पुण्याच्या महापालिका आयुक्त पदावरून शेखर गायकवाड यांना काढण्यात आले, असा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी केला आहे. अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या या बदलीमुळे राज्य सरकारची प्रतिमा खराब झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

- पुणेकरांनो, उद्या दिवसभर दुकाने खुली राहणार, मात्र...

गायकवाड यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर दोन महिन्यांतच शहराला कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी, त्यातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढती आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. रुग्णांना बेडही उपलब्ध होत आहेत.

'राजभवनात कोरोना, अमिताभजींना कोरोना' असं म्हणत सामंतांनी UGCला लावला टोला!​

टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल करताना त्यांनी केलेल्या नियोजनामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू लागली होती. कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांनी एका सैनिकाप्रमाणे काम केले. या बरोबरच महापलिकेतील भ्रष्टाचाराही अनेक प्रकरणेही त्यांनी शोधून काढली. त्यातून पुणेकरांचे पैसे वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. महापालिकेत भाजपच्या उधळपट्टीला त्यांनी लगाम घातला. त्यामुळे त्यांची बदली होणे म्हणजे गलिच्छ राजकारणाचे प्रतिक आहे.

विद्यार्थी आणि पालकांनो, अॅडमिशनसाठी दाखले काढायचे आहेत? आता करा ऑनलाईन अर्ज!​

काही सत्ताधाऱ्यांना महापालिका आयुक्त हे ताटाखालचे मांजर असावे, असे वाटते. शिवाय त्यांची बदली करताना पूर्वीच्याच पदावर करण्यात आली आहे. जर त्यांना पूर्वीच्याच पदावर नियुक्त करायचे होते, तर सहा महिन्यांनासाठीच पुणे महापालिकेत त्यांना का आणले होते?, असा प्रश्‍न पुणेकरांना पडला आहे. पूर्वी एका ठेकेदारामुळे आयुक्तांची बदली झाली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर गायकवाड यांची बदली कोणाच्या दबावाखातर झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे राज्य सरकारची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे गायकवाड यांची बदली रद्द करावी आणि त्यांना पुन्हा महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्त करावे, असेही बालगुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image