esakal | पन्नास रुपयांत मिळणाऱ्या तीन कोंबड्यांचा सध्याचा दर जाणून घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

chicken prices

पन्नास रुपयांत मिळणाऱ्या तीन कोंबड्यांचा सध्याचा दर जाणून घ्या!

sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : कोरोनो विषाणू तसेच चिकनचा काहीही संबध नसला तरी पोल्ट्री व्यवसायिकांवरील कोरोनाचे शुक्लकाष्ठ काही संपता संपेना मागील वर्षी लॉकडाउनमध्ये केवळ अफवेने नागरिकांनी चिकन खाणे बंद केल्याने पोल्ट्री व्यवसायिकांना अवघ्या 50 रुपयांत तीन कोंबड्या विकण्याची वेळ आली होती. या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये 200 ते 250 रुपयाला एक कोंबडी विकली जात असली, तरी कोंबड्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाजारभाव चांगला मिऴूनही पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. काही महिण्यांपूर्वी देशाबरोबर राज्यातील काही जिल्ह्यात कोंबड्यांना 'बर्ड फ्लु'ची लागण झाली होती. या रोगात कोंबड्या दगावण्याचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर असते. भारतात चिकन खाणे सुरक्षित असल्याचे शासनाने वारंवार जाहीर करुनही काहीनीं चिकन खाणे बंद केले होते. मागणी कमी असल्याने बाजारभावही कमी झाले होते. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी पोल्ट्री रिकामी ठेऊन काही दिवसांसाठी व्यवसाय बंद केला. त्यामुळे बाजारातील कोंबड्याची आवक घटली मार्च महिण्याच्या सुरवातीपासूनच कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले.

हेही वाचा: ‘पंच’नामा : उत्सव निर्बंधांचा, जप शिवथाळीचा

शरिराची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नागरिक पुन्हा अंडी, चिकन व मटणकडे वळले. त्यामुळे चिकनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. जिवंत कोबंडीचे दर मागील पंधरवड्यापर्यंत प्रती किलो 120 रुपये या उच्चांकी दरावर जाऊन पोचले. चिकनही प्रती किलो 200 ते 220 रुपयावर गेल्याचे अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील चिकन विक्रेते बाबु मणियार यांनी सांगितले. त्यातच मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने जिवंत कोंबडीचे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये खरेदीचे प्रतीकिलोचे सरासरी दर 70 ते 75 रुपये होता तोच दर मार्चमध्ये 120 रुपयांवर गेला होता, तर सध्या 80 ते 90 रुपयांच्या दरम्यान स्थिरावला आहे. जिवंत कोंबडीला मागील वर्षीच्या तुलनेने बाजारभाव चांगले मिळत असले तरी उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्पादकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: साधना बॅंकेच्या माजी अध्यक्षांसह पत्नीला दरोडेखोरांची बेदम मारहाण

पोल्ट्री व्यवसायिकाला एका कोंबडीला प्रती किलोसाठी एक महीन्यापुर्वी 70 ते 75 रुपये उत्पादन खर्च येत होता. परंतु कच्चामालाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे, खाद्यासाठी वापरण्यात येणारा मुख्य घटक सोयामीलच्या दरात दुप्पट वाढ झाली. पशुपक्षांच्या खाद्यांमध्ये साधारण 25 टक्के सोयामील वापरले जाते. त्याचे दर 35 रुपये प्रती किलोवरुन 72 रुपयांवर गेले आहे, तरीही उत्पादन फारच कमी आहे. मकेचे दर 16 रुपये प्रतीकिलो वरुन 18 रुपयांवर गेले आहे मकेचे नविन उत्पादन बाजारात येऊन ही दर वाढतच आहे. खाद्यात वापरले जाणारे विविध खनीज मिश्रने परदेशातून आयात करावी लागतात. लॉकडाऊनमुळे कंटेनरची उपलब्धतता होत नसल्याने त्यांच्याही किंमती दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे प्रतीकिलोसाठी येणारा उत्पादन खर्च हा 105 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जीवंत कोबंडीला प्रतीकिलोला सध्या 90 रुपये हा चांगला बाजारभाव मिळूनही व्यावयायिकाला प्रतीकिलोला म्हणजे एका कोंबडीमागे (एका कोंबडीचे सरासरी वजन दोन ते सव्वादोन किलो असते) सुमारे 30 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: ससून 'व्हेंटिलेटरवर'; एकाच बेडवर होतायत तिघांवर उपचार

मागील वर्षाच्या एप्रिलमध्ये केवळ अफवेतून कोरोनो विषाणु संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांनी चिकन खाणे बंद केले होते. त्यामुळे जिवंत कोबंडीचा प्रती किलोचा दर 10 ते 12 रुपयांवर आला होता. बाजारात अक्षरश: 50 रुपयांत तीन कोंबड्या मिळत होत्या. आत्ताच्या लॉकडाऊनमध्ये शासनाने चिकन, मटन व अंडी विक्रीला परवानगी दिल्याने चिकनला मागणी वाढली परंतु आवक नसल्याने जीवंत कोंबडीचा दर प्रतीकिलोला 100 रुपयापर्यंत गेला आहे म्हणजे एक कोबंडी 200 ते 250 रुपयांवर गेली आहे चिकनही प्रती किलो 200 ते 220 रुपयांपर्यंत गेले आहे.