
चास : ''मी जरी खासदार नसलो तरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपलेच आहेत. विकासाकांमाना भरीव निधी देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देताना दोन तालुक्यांना जोडणारे रस्ते पक्क्या स्वरूपात करण्यासाठी तातडीने रक्कम वर्ग करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पा. यांनी नायफड ( ता. खेड ) येथे व्यक्त केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नायफड येथील चाफेआळी मधील खेमा रामजी तिटकारे यांच्या घराला सोमवार (ता. 2) शॅाक सर्किटने आग लागून घरातील सर्व चिजवस्तू जळून खाक झाल्याने त्या कुटुंबाला अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडावे लागले होते. या कुटुंबाचे सात्वन करण्याबरोबरच त्यांना धिर देवून आर्थिंक मदतीबरोबरच जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवार (ता. 4) नायफड गावाला भेट देवून या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा महिला अध्यक्षा व राजगुरूनगर सह बॅंकेच्या अध्यक्षा विजयाताई शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल बानखेले, पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, उपसभापती ज्योती अरगडे, मा सभापती अंकुश राक्षे, मा उपसभापती अमोल दादा पवार, केशव आरगडे, अमर कांबळे, रविंद्र करंजखेले, समर्थ फाऊंडेशनचे विजय शिंदे, तालुका प्रमुख आबा धनवटे, उपतालुका प्रमुख अंबर सावंत, चाकणचे उपनगराध्यक्ष अॅड. प्रकाश गोरे, अजित घारे गावचे सरपंच दत्ता तिटकारे, ग्रामसेविका शितल लकारे, माऊली तिटकारे, दिपक वाढाणे, अनिल कौदरे, विजय उगले, अंकुश शिर्के यांसह नागरिक उपस्थित होते.
पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग
यावेळी पुढे बोलताना आढळराव म्हणाले की, ''संबधीत कुटूंबाच्या दुख्खात आम्ही सहभागी असून जेवढी मदत करू तेवढी थोडीच आहे., मात्र वेळोवेळी आम्ही मदत करत राहू, महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून या कुटुंबाला मदत करून देण्याबरोबरच आदिवासी विभागाशी संपर्क साधून मदत करता येईल. तसेच माझ्याकडे केंद्राचा पाच कोटीचा निधी शिल्लक असून त्यामध्ये दोन तालुक्याला जोडणारे वाडा-घोडेगांव व डेहणे-धाबेवाडी या रस्त्यांसाठी निधी देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आढळरावांनी या कुटुंबाला रोख पाच हजार रूपये या शिवाय समर्थ फाऊंडेशनच्या वतीने विजयभाऊ शिंदे यांनी या कुटुंबाला किराणा, कपडे, आंथरून-पांघरून यांसह अन्य चिजवस्तू भेट देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.