चिमुरडीच्या वेदनेवर ‘मेक अ विश’ची फुंकर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

आठ वर्षांचं चिमुकलं वय. त्यात दुर्धर आजाराची वेदना घेऊन जगणाऱ्या कीर्तीच्या गालावरची कळी फुलली. ती हसली, खेळली आणि बागडली. ‘मेक अ विश’ आणि सिप्ला परिहार सेवा संस्थेने तिची सायकल आणि टेडी बेअरची इच्छा पूर्ण केली अन्‌ गेल्या दोन वर्षांपासून ल्युकेमिया आजाराच्या वेदना ती काही क्षणांसाठी विसरून गेली...

पुणे - आठ वर्षांचं चिमुकलं वय. त्यात दुर्धर आजाराची वेदना घेऊन जगणाऱ्या कीर्तीच्या गालावरची कळी फुलली. ती हसली, खेळली आणि बागडली. ‘मेक अ विश’ आणि सिप्ला परिहार सेवा संस्थेने तिची सायकल आणि टेडी बेअरची इच्छा पूर्ण केली अन्‌ गेल्या दोन वर्षांपासून ल्युकेमिया आजाराच्या वेदना ती काही क्षणांसाठी विसरून गेली... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केमोथेरपीचा उपचार झाल्यानंतर तिच्या उजव्या डोळ्यांची दृष्टी गेली. त्यानंतर ती सिप्ला परिहार सेवा आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये दाखल झाली. 

कीर्तीची सायकल आणि टेडी बेअरची इच्छा पूर्ण करून तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात हर्ष आणण्यासाठी या केंद्राने ‘मेक अ विश फाउंडेशन’च्या सहयोगाने काम केले. 

धबधब्याच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह दोन दिवसांनंतर लागला हाती 

सिप्ला परिहार सेवा आणि प्रशिक्षण केंद्र हे १९९७ पासून कर्करोगाच्या रुग्णांना मोफत सेवा पुणे येथे देत आहेत तसेच पुणे शहरातील रुग्णांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन सेवा देतात. आजपर्यंत सुमारे १७ हजार ५०० रुग्णांना सेवा दिली आहे. तेथे अखिला कोपरकर आणि नम्रता पेंढारकर वैद्यकीय समाज सेवक कीर्ती आणि तिच्या कुटुंबाची काळजी केंद्रामध्ये घेतात. त्या म्हणाल्या, ‘‘कोविड महामारीच्या अनिश्‍चिततेच्या काळातही सेवा करण्याच्या आपल्या भावनेला कोणीही बंदिस्त करू शकत नाही. रुग्णाचे आणि त्यांच्या परिजनांच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्यासाठी अशा प्रकारचे सकारात्मक अनुभव खूप मोलाचे ठरतात.’

कनेक्‍टिंग विमानांची गैरसोय झाल्यास प्रवासाचा वेळ वाढणार

केंद्राच्या सदस्यांच्या प्रेमळ आणि सहृदय कृतीचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. अनेक महिन्यानंतर आज मी माझ्या मुलीला हसताना पाहिले आहे.
-अशोक काटकर, कीर्तीचे वडील

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child sickness make a wish help humanity cycle teddy bear