Pune Election : पोटनिवडणुकीत राजकीय घमासान! पहिल्याच दिवशी 20 उमेदवाऱ्यांनी खरेदी केले अर्ज Chinchwad bypoll election 20 candidates bought applications on the first day itself | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Election

Pune Election : पोटनिवडणुकीत राजकीय घमासान! पहिल्याच दिवशी 20 उमेदवाऱ्यांनी खरेदी केले अर्ज

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) वितरण व स्वीकृती सुरू झाली. पहिल्याच दिवशी वीस जणांनी अर्ज नेले.भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकृती सात फेब्रुवारीपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत केली जाईल.

आज (मंगळवारी) २० व्यक्तींनी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यांची प्राथमिक माहिती नोंदवली जात आहे. यामध्ये अर्ज नेल्याचा दिनांक व वेळेसह उमेदवाराचे नाव, पत्ता, अर्जांची संख्या, राजकीय पक्षाचे नाव, उमेदवाराचा प्रवर्ग, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, अर्ज ताब्यात घेणाऱ्याचे नाव आदी बाबींचा समावेश आहे. अर्ज ताब्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन त्याची प्रत व आचारसंहिता पुस्तिकेची प्रत दिली जात आहे.

या लोकांनी खरेदी केले अर्ज

ॲड. अनिल सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), बायडाबाई उर्फ कल्पना काटे (भारतीय जनता पक्ष), माया बारणे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रफुल्ला मोनसिंग (अपक्ष), हरिभाऊ मोरे (अपक्ष), संभाजी बारणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), मिलिंद भोसले (अपक्ष), रफिक कुरेशी (अपक्ष), बाळू शिंदे (अपक्ष), राजेंद्र जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस), रावसाहेब चव्हाण (परिवर्तन विकास आघाडी), जावेद शेख (एमआयएम), दादाराव कांबळे (अपक्ष), वहिदा शेख (अपक्ष), अविनाश गायकवाड (अपक्ष), रवींद्र पारदे (वंचित बहुजन आघाडी), अजय लोंढे (अपक्ष), सुधीर जगताप (अपक्ष), बालाजी जगताप (अपक्ष), सालारभाई शेख (अपक्ष).

असे आहेत अर्ज

पक्ष / संख्या

आरपीआय / १

भाजप / १

राष्ट्रवादी / ३

परिवर्तन आघाडी / १

एमआयएम / १

वंचित आघाडी / १

अपक्ष / १२

एकूण / २०

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सात फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकृती केली जाईल. सुटीचे दिवस वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन अशी वेळ आहे. पोलिसांनाही बंदोबस्ताबाबत सूचना केली आहे. प्रशासनाची सर्व तयारी झाली असून ५१० मतदान केंद्र असतील.

- अजित पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी

टॅग्स :puneelection