चोपडी गावात वाजणाऱ्या डीजे बाबत वयोवृद्ध लोकांची तंटामुक्त समिती अध्यक्षांकडेकडे तक्रार

चोपडी गावात वाजणाऱ्या डीजे बाबत वयोवृद्ध लोकांची तंटामुक्त समिती अध्यक्षांकडेकडे तक्रार
Published on

डीजेचा दुष्परिणामाचा फोटो वापरावा.
---
डीजेच्या कर्कश आवाजाने चोपडीत आरोग्य धोक्यात
डीजे बंद करा : वयोवृद्ध नागरिकांची तंटामुक्त समिती अध्यक्षांकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
नाझरे, ता. १७ : सोलापूर जिल्ह्यात डीजेबंदीचे आदेश असतानाही सांगोला तालुक्यातील चोपडी गावात कर्णकर्कश डीजेचा धडाका सुरूच आहे. गेल्या महिनाभरात तब्बल १५ ते २० वेळा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने डीजे वाजवण्यात आल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. विशेषतः वयोवृद्ध, बायपास शस्त्रक्रिया झालेल्या, बीपी व शुगर असलेल्या नागरिकांना याचा मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
गावात लग्न समारंभ, विविध पदांवरील भरती, महापुरुषांच्या जयंती तसेच इतर कार्यक्रमांसाठी मोठ्या आवाजातील डीजेचा वापर करण्यात आला. डीजे सुरू होताच गावातील चौकात थांबलेले ग्रामस्थ तातडीने घराकडे धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
---
घरातील भांडीही थरथरली; नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत
डीजेचा आवाज इतका तीव्र होता, की गावभागातील घरांमध्ये स्वयंपाकघरातील भांडीही थरथरून खाली पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सातत्याने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता वाढली असून, आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या वाढत्या त्रासामुळे चोपडी येथील कमलाबाई प्रल्हाद बाबर यांच्यासह अनेक नागरिकांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बाबर यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. गावात वारंवार होणाऱ्या डीजेमुळे लोक हैराण झाले असून, यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
---
कोट
आपण एखादा आनंदोत्सव, जयंती, लग्न समारंभ अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा करत असताना पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. डीजेमुळे लोकांमध्ये बहिरेपणा येण्याचे प्रमाण वाढत आहे. जास्त डेसिबलच्या आवाजामुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होत आहे. वयोवृद्ध तसेच लहान बालकांचा विचार करून चोपडी गावात लवकरच विशेष ग्रामसभा आयोजित करून डीजेबंदीचा निर्णय करण्यात येईल. या निर्णयाला संपूर्ण गावकऱ्यांचा प्रतिसाद लाभेल, असा मला विश्वास आहे.
- ज्ञानेश्वर बाबर, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, चोपडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com