Pune : व्यावसायिकांकडून मुहूर्तावर चोपडी, वही खरेदी

दैनंदिन वापरासाठी लॅपटॉप, संगणक खरेदीवर अधिक व्यापाऱ्यांचा कल दिसून आला
Pune
Pune sakal
Summary

दैनंदिन वापरासाठी लॅपटॉप, संगणक खरेदीवर अधिक व्यापाऱ्यांचा कल दिसून आला

पुणे : कपडे, फटाके आणि दिवाळीच्या खरेदीनंतर पुणेकरांनी रविवारी चोपडा, वही आणि संगणक खरेदीचा मुहूर्त साधला. मुख्य शहरातील रविवार पेठ, शुक्रवार पेठ आणि मंडईच्या बाजारपेठांत ग्राहकांनी गर्दी केली होती.

रविवारी सकाळी मुहूर्तावरील चोपडी, वही खरेदीबरोबरच लक्ष्मीपूजनाच्या साहित्याच्या खरेदीचा उत्साह बाजारपेठेत दिसून आला. व्यापाऱ्यांनी परंपरेप्रमाणे चोपडी, वही खरेदी केली, मात्र प्रत्यक्षात दैनंदिन वापरासाठी लॅपटॉप, संगणक खरेदीवर अधिक व्यापाऱ्यांचा कल दिसून आला. कारखानदार, उद्योजकांनी मुहूर्तावरच संगणक, चोपडी, वही खरेदी करीत असल्याचे बाजारपेठेत चित्र होते.

त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचे साहित्य, मुर्ती, फुले आणि सजावटीच्या खरेदीचाही उत्साह दिसला. मात्र इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी काहीशी गर्दी कमी होती. मुख्य बाजारपेठा वगळता शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर तुलनेने खूप कमी गर्दी दिसत होती. त्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असल्याने बहुतेकांनी दुपारपर्यंत खरेदीसाठी बाहेर जाण्याचे टाळल्याचे रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीतून दिसून आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चोपडी आणि वही खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही १२० वर्षांपासून विक्री करत असल्याने आमच्या पारंपारिक ग्राहकांनी शनिवारी व रविवारी सकाळी चोपडीची खरेदी केली. यंदा २५ ते ३० टक्के भाव वाढले असू, परंपरा जपत नव्या पिढीनेही चोपडी खरेदीसाठी मुहूर्त साधला.

- मोईज चोपडावाला, शुक्रवार पेठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com