Video : पुण्यातील फुगेवाडी दुर्घटनेचा असा घडला थरार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अशी घडली दुर्दैवी घटना... 

पिंपरी : दापोडी-फुगेवाडी उड्डाणपूला जवळील दुर्घटनेत खोल खड्ड्यात गाडल्या गेलेले बिगारी मजूर नागेश जमादार यांचा मृतदेह पहाटे 3.30 वाजता बचाव पथकांनी बाहेर काढला. सुमारे दहा तास हे बचाव कार्य सुरु होते. 

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी दिलेल्या माहिती नुसार, या दुर्घटनेत, अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांचे निधन झाले. तर, दलाच्या इतर दोघा जवानांसह दोन जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. 

 

फुगेवाडी उड्डाणपूल येथील आनंदवन वसाहत परिसरामध्ये महापालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत जलनिस्सारण वाहिनीचे काम चालू आहे. यासाठी  सुमारे 25 फूटांपर्यंतचा खोल खड्डा करण्यात आला. त्यामध्ये बिगारी मजूरांसह एकूण तीन जण अडकले होते.

Video : पुणे : फुगेवाडी दुर्घटनेतील मजूराचा अखेर मृत्यू

अशी घडली दुर्दैवी घटना... 
- नागेश जमादार काम करत असताना खड्ड्यात पडला. 
- नागेशचे दोघे साथीदार मजूर त्याच्या बचावासाठी धावले. 
- बघ्यांच्या गर्दीमुळे खड्ड्यात हळूहळू माती पडण्यास सुरूवात. 
- काही वेळातच अग्निशामक दलाचे सहा जणांचे पथक मदतीसाठी धावले. 
- माती पडू लागल्यामुळे तीन अग्निशामक दलाचे जवान तत्काळ बाहेर पडले. 
- तीन जवान अजूनही मजुरांना वाचविण्यासाठी धडपड करीत होते. 
- त्याचवेळी मातीचा मोठा ढिगारा त्यांच्यावर कोसळल्याने ते दबले गेले. 
- पुणे व पिंपरी-चिंचवड अग्निशामक दल, एनडीआरएफचे पथक मदतीसाठी दाखल झाले. 
- तिन्ही जवानांना बाहेर काढले, एकाचा मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. 
- बचाव यंत्रणांकडून रात्री उशीरापर्यंत तीन मजुरांचे शोधकार्य सुरू होते.
- यातील दोन मजूरांना वाचविण्यात यश आले.
- मात्र, सर्वात प्रथम खड्ड्यात अडकलेले मजूर नागेश जमादार यांचा मृतदेह पहाटे 3.30 मिळाला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chronology of mishap in Phugewadi Pune