डिजीटल पासच्या नावाखाली नागरिकांची होत आहे लूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

तुम्हाला अन्य जिल्ह्यात जायचे असेल तर किमान पाचशे रूपये आणि पररज्यात जायचे असेल तर कमीत कमी एक हजार रूपये मोजावे लागतील. हे पैसे तिकीटाचे नाहीत, तर डाटा एंट्री ऑपरेटरकडून केवळ एका पाससाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेचे आकारले जाणारे शुल्क आहे. अशा पद्धतीने सध्या ऑनलाईन प्रक्रिया करता न येणाऱ्या नागरिकांची लूट सुरू आहे.

पुणे - तुम्हाला अन्य जिल्ह्यात जायचे असेल तर किमान पाचशे रूपये आणि पररज्यात जायचे असेल तर कमीत कमी एक हजार रूपये मोजावे लागतील. हे पैसे तिकीटाचे नाहीत, तर डाटा एंट्री ऑपरेटरकडून केवळ एका पाससाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेचे आकारले जाणारे शुल्क आहे. अशा पद्धतीने सध्या ऑनलाईन प्रक्रिया करता न येणाऱ्या नागरिकांची लूट सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पोलिसांकडून लॉकडाउनमध्ये व संचारबंदी शिथिल झाल्यानंतरही गरजेच्यावेळी प्रवासासाठी www.punepolice.in  या लिंकद्वारे डिजीटल पासची सुविधा उपलब्ध केली होती. त्याचा गरजूंना चांगला फायदा झाला. मात्र ऑनलाईन प्रक्रिया करता न येऊ शकणाऱ्या व्यक्ती, ट्रक, खासगी कार, बस बाहेर गावी घेऊन जाणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया करून पास मिळविणे अवघड जाते. नेमक्‍या त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काही एजंट, डाटा एंट्री ऑपरेटर मोठ्या प्रमाणात पैसे आकारत आहेत.

हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील! 

पुणे पोलिसांचा सेवा सेल विभाग २४ तास कार्यरत आहे. पाससाठी अर्जाचा त्यांच्या गरजेनुसार विचार केला जातो. मात्र, त्यासाठी लुबाडणूक होत असेल तर त्याचा गांभीर्यने विचार केला जाईल.
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

अशी होतेय लुट 
राज्यात कुठेही जायचे असेल तर पाससाठी २०० ते ६०० रुपये आकारले जातात. तर परराज्यात जाण्यासाठी ७०० ते १००० रूपये आकारले जातात. राज्यातील पाससाठी सकाळी ९ वाजता अर्ज केल्यानंतर सायंकाळी ६ पर्यंत पास मिळवून दिला जातो, तर परराज्यातील पास १२ तासात उपलब्ध करुन दिला जात आहे.

खडकवासला गाव 'एवढे' दिवस राहणार बंद

शुल्क आकारणीवर नियंत्रण आवश्‍यक
डिजीटल पास मिळवून देण्याबाबतच्या अनेक जाहिराती व्हॉट्‌सअप, फेसबुक व अन्य समाजमाध्यमाद्वारे केले जात आहेत. संबंधित डाटा एंट्री ऑपरेटरने किती पैसे घ्यावेत, याबाबत नियम नाहीत तसेच त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही.

पासचा गैरवापर आणि गुन्हे

  • पुणे पोलिसांकडे दिलेला अर्ज मंजूर होण्यापूर्वीच तामिळनाडूला प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या बसचालकाविरुद्ध गुन्हा.
  • पोलिस परवान्यांच्या दिनांकात फेरफार करुन गडचिरोली येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाविरुद्ध गुन्हा. 
  • चुकीची माहिती देऊन प्रवासी परवाना मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ जणावरही गुन्हा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens are being robbed under the name of digital pass