esakal | बारामतीकरांनो, दुखणं अंगावर काढू नका; नाहीतर...
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

थंडी वाजून येणे, ताप कमी न होणे, घसा खवखवणे, यासारखी लक्षणे दिसल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्यायला हवा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.

बारामतीकरांनो, दुखणं अंगावर काढू नका; नाहीतर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : सामाजिक अघोषित बहिष्काराची भीती, कोरोना झाल्यास समाजाचा पाहण्याचा बदलणारा दृष्टीकोन, क्वॉरंटाईन होण्याची भीती, घरी येणारी प्रशासकीय यंत्रणा... या सारख्या कारणांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लक्षणे दिसूनही आजार अंगावर काढत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. 

अनेकदा कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करावी, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र गेल्या चार महिन्यात कोरोनाने जे थैमान घातले आहे, दररोज त्याची समीकरणे ज्या वेगाने बदलत आहेत, ती पाहता ग्रामीण भागातील लोक तपासणीसाठीच घाबरू लागले आहेत. 

आता फसव्या जाहीरातींना बसणार चाप; सरकारने बनवली स्पेशल अॅथोरिटी!​

उशिराने दवाखान्यात दाखल होणे, हे प्रकृतीच्या दृष्टीने घातक असल्याने थोडी जरी लक्षणे आढळल्यास आजार अंगावर काढू नका, असे वारंवार सांगूनही लोक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा गावातून आशा सेविका घरोघरी जाऊन माहिती घेतानाही त्यांना कोणताही आजार नसल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे अनेकदा उपचारही यशस्वी ठरत नसल्याचे दिसत आहे. 

थंडी वाजून येणे, ताप कमी न होणे, घसा खवखवणे, यासारखी लक्षणे दिसल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्यायला हवा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.

लॉकडाऊन संपला अन् पुण्यातील रस्त्यांवर वर्दळ झाली सुरू​

अंगावर दुखणे काढू नका...
बारामतीतील काही कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूमध्ये उशिरा दवाखान्यात दाखल होणे हे प्रमुख कारण आढळून आलं आहे. अंगावर दुखणे काढण्यापेक्षाही तातडीने दवाखाना गाठून डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करावी. वेळेत निदान झाल्यास योग्य ती काळजी घेता येणे शक्य होते, संपर्काचाही धोका कमी होतो. इतर कोणत्याही गोष्टीची भीती मनात न बाळगता ज्यांना लक्षणे आढळतील, त्यांनी तातडीने सल्ला घ्यावा.
- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)