lock down
lock down

जेजुरी, वाल्ह्यातील नागरिक पाळणार स्वयंस्फूर्तीने बंद

पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी व वाल्हे येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांना महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार  जेजुरी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आजपासून पाच दिवस बंद राहतील. तसेच, वाल्हे येथील व्यापाऱ्यांसह व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फूर्तीने अत्यावश्यक सेवा वगळून आठवड्यातील एक दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जेजुरी : जेजुरी शहर गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुक्त होती. मात्र, आज दोन रुग्णांचे खासगी तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जेजुरीत दोन महिन्यानंतर अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
जेजुरीत नऊ मे रोजी देवसंस्थानच्या डायलिसिस सेंटरचा एक टेक्नीशयनचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यानंतर दोनच दिवसात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर जेजुरी कोरोनामुक्त होती. तेव्हापासून जेजुरीकर नागरीक शासनाच्या नियमानुसार दिलेल्या वेळेत काम करित होते. बाहेरून आलेल्यांची योग्य ती खबरदारी घेतली जात होती. त्यामुळे दोन महिने परिसरात कोरोनोचे रुग्ण असताना जजुरी मात्र कोरोनापासून दूर होती.  काल घेतलेल्या खासगी दहापैकी ९ स्वॅबचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये ३ पॉझिटिव्ह रुग्ण असून, दोन जेजुरीतील आहेत. 

जेजुरी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एक व जुनी जेजुरी परिसरातील एक (सध्या राहणार विद्यानगर), असे दोन रुग्ण आहेत. त्यामध्ये एका पालिकेच्या माजी पदाधिका-याचा समावेश आहे.  गेली दोन महिन्यापासून कोरोनामुक्त असलेल्या जेजुरीत अखेर कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे.जे जुरी पालिकेच्यावतीने जेजुरीत जंतूनाशकाची फवारणी सुरु करण्यात आली आहे. तर शिक्षकांच्या मदतीने शहरात सर्वेचे काम सुरु करण्यात आले आहे. 

जेजुरीचे खंडोबा मंदिर हे सतरा मार्चपासून बंद आहे. पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहे. जेजुरीत जनता बंदचे आवाहन स्थानिक पदाधिका-यांनी केले आहे. जेजुरी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आजपासून पाच दिवस बंद राहतील असे जेजुरी नगरपालिका व ग्रामस्थ यांनी ठरवले आहे. अशा सूचना आज गावात देण्यात आल्या.

वाल्हे : पुरंदर तालुक्यासह ग्रामीण भागामधील वाल्हे येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभुमीवर आजपासून येथील व्यापाऱ्यांसह व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फुर्तीने अत्यावश्यक सेवा वगळून आठवड्यातील एक दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसंख्येबाबतीत परिसरात वाल्हे गाव मोठे असून कालपर्यंत चांगले नियंत्रण होते. शिस्तबद्ध पद्धतीने मात करण्याचे प्रयत्न ग्रामस्थांच्या सहकार्याने केले जात होते. दरम्यान काल वाल्हेनजिकच्या मकदमवाडी येथे आपल्या मूळ गावी कुर्ला मुंबई येथुन आलेल्या तरुणाचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. तसेच, दौंडज- तरसदरा या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी सुटीला आलेल्या मुंबईकर जावयाचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे वाल्ह्यासह दौंडज ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील व्यापारी व व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फूर्तीने आजपासून आठवड्यातील दर बुधवारी एक दिवस जनता कर्फ्युचा निर्णय घेऊन आज संपुर्ण गाव कडकडीत बंद करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडिकल, दुध विक्रेते आदी बाबी वगळून सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद आहेत. उद्या गुरूवारपासुन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार असल्याचे सरपंच अमोल खवले व ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com