पैसे भरूनही वीजमिटरसाठी नागरिकांना पाहावी लागते वाट 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

छोटी दुकाने अथवा सदनिकांना यांना सिंगल फेज मीटरची आवश्‍यकता आहे. फर्म कोटेशन भरून टेस्ट रिपोर्ट दिला की मीटर मिळते. परंतु आता फर्म कोटेशन भरून एक महिन्यांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर "मीटर उपलब्ध नाहीत. जसे उपलब्ध होतील, असे दिले जाईल' असे महाविरणच्या सर्व शाखा कार्यालयातून सांगितले जाते.

पुणे : ग्राहकांना तत्काळ वीज मीटर उपलब्ध करून द्या, वीजमीटरच पुरेसा साठा आहे, असा वारंवार दावा महावितरणकडून एकीकडे केला जातो. दुसरीकडे मात्र पैसे भरूनही दीड ते दोन महिने मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहे. महावितरणचा महसूल कमी झाला असताना दुसरीकडे नागरिकांना पैसे भरूनही मिटरसाठी वाट पाहावी लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

छोटी दुकाने अथवा सदनिकांना यांना सिंगल फेज मीटरची आवश्‍यकता आहे. फर्म कोटेशन भरून टेस्ट रिपोर्ट दिला की मीटर मिळते. परंतु आता फर्म कोटेशन भरून एक महिन्यांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही मीटर मिळत नसल्याचे समोर आले आहेत. याबाबत चौकशी केल्यानंतर "मीटर उपलब्ध नाहीत. जसे उपलब्ध होतील, असे दिले जाईल' असे महाविरणच्या सर्व शाखा कार्यालयातून सांगितले जाते. नवीन वीजजोडच्या बाबतचा हा अनुभव नादुरुस्त मीटरच्या बाबत नागरिकांना येत आहे. नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी किमान चार महिने नागरिकांना थांबे लागत आहे. त्यामुळे अशा नागरिकांकडून सरासरी वीजबिलाची आकारणी केली जाते. त्यातून वाद निर्माण होत असल्याचे अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. 

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​

महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून या मीटरची निविदा मागवून खरेदी केली जाते. खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही नादुरुस्त आणि नवीन जोडांसाठी आवश्‍यक ती संख्या लक्षात घेऊन खरेदी केली जाते. असे असूनही मीटरचा तुटवडा कशा प्रकारे जाणतो, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. वास्तविक ही सर्व प्रक्रिया ऑनलाइनच्या माध्यमातून होते. त्यामुळे मुख्य कार्यालयाला कोणत्या परिमंडळात किती नादुरुस्त, किती पेड पेंडिंग अर्ज आहेत, यांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होते. असे असून ही नागरिकांना पैसे भरूनही मिटरसाठी का थांबावे लागते. कात्रज, मुंढवा, हडपसर, बावधन, नऱ्हे, भूकंप अशा सर्वच ठिकाणी ही परिस्थीती असल्याचे दिसून आले आहे. 

''नवीन मीटरसाठी एक महिन्यांपूर्वी पैसे भरले आहेत. अद्यापही मीटर उपलब्ध झालेले नाही. वारंवार चौकशी करूनही मीटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते आहे.''
- पी.एम. कुटे (सिंहगड रोड) 

उपमुख्यमंत्र्यांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल; शहरातील परिस्थितीबाबत ठरवले जबाबदार! 

''पैस भरले आहेत. मीटर कधी मिळणार चौकशीसाठी गेलो, तर उपलब्ध झालेले नाहीत, जेव्हा येतील, तेव्हा तुम्हाला कळवू, असे सांगून परत पाठविले जात आहे. मीटर उपलब्ध नाहीत,तर मग पैसे कशाला भरून घेतले.''
- संदीप चव्हाण (भूकंप) 

 

सुनेनं बळकावलेल्या घराचा ताबा मिळाला सासूला; घटस्फोटानंतरही राहत होती घरात​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens have to wait for electricity meter even after paying

टॉपिकस
Topic Tags: