khalad
khalad

महापुराच्या धास्तीने पुरंदरमधील नागरिकांना झोपही लागेना... 

खळद (पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील खळद हे गाव कऱ्हा नदी तीरावर वसलेले आहे. या ठिकाणी नदीच्या पात्राचा विस्तार हा गावच्या दिशेने होतो. त्यामुळे नदीला महापूर आला, तर गाव वाहून जाण्याच्या धास्तीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुरातून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

खळद ग्रामस्थ मागील वर्षी 25 सप्टेंबरच्या राव शांतपणे झोपले होते. त्यावेळी अचानक कऱ्हा नदीला महापूर आला होता. या वेळी गावात पाणी शिरून शेती, रस्ते आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. मात्र, लोकवस्तीच्या बाजूने नदी पात्राचा विस्तार झाला आहे. तो आता गावासाठी संभाव्य धोका ठरण्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे. 

खळद गावामध्ये ब्राम्हणडोह प्रसिद्ध आहे. येथील नदीपात्रापासून 40 ते 50 फूट उंचीवर बाजूला आरोग्य केंद्र, ईभाड आळी आहे. मात्र, आता हा डोह वाहून गेला असून, दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरातील मोठी झाडे पडली आहेत. नदीला पुन्हा महापूर आल्यास लोकवस्तीमध्ये पाणी शिरून अर्धा गाव वाहून जाण्याचा धोका नाकारता येत नाही. 

तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी खळदसह कऱ्हा नदी काठच्या गावांना भेट देऊन पाहणी करावी. या गावांना संभाव्य महापुरापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

मंचरला आठवडे बाजार भऱणार तोही दोन दिवस
 
नदीला गेल्यावर्षी आलेल्या महापुरातील नुकसानग्रस्तांना प्रशासनाने अद्यापही भरपाई दिली नाही. दुरुस्तीची कामे झाली नसून नदीपात्रालगत संरक्षक भिंतही उभारली नाही. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना तत्काळ दुरुस्त होईल, अशा कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. त्यामुळे शांतपणे झोप लागत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

खळदमध्ये सध्याच्या स्थितीत महापूर आल्यास लोकवस्ती वाहून जाऊन शकते. यातून मोठी जीवितहानी होण्याचा धोका आहे. अशी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात. 
 - यशवंत ईभाड
अध्यक्ष, संत सेवा संघ खळद 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com