कोरेगाव भीमा शौर्यदिन: यंदा विजयस्तंभाला घरातूनच अभिवादन करा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 December 2020

दरवर्षी उत्साहात साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन भीमा कोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे : कोरोनोचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन शौर्य दिन सोहळा नागरिकांनी ६ डिसेंबरच्या धर्तीवर साधेपणाने साजरा करावा. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी राजकीय पक्ष आणि संघटनांना परवानगी देऊ नये. नागरिकांनी घरात राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे. 

पुण्यात गुन्हेगारांची झाडाझडती; 'कोम्बिंग ऑपरेशन'द्वारे ५५ जणांना अटक

कोरेगाव भीमा येथील लढ्यातील शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा साजरा केला जातो. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असून, अद्याप धोका टळलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानेने कोरेगाव भीमा येथील गर्दी टाळण्यासाठी कोणालाही अभिवादन सभा घेण्यास परवानगी देऊ नये. नागरिकांनी घरातच राहून मानवंदना द्यावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड यांनी केले आहे. 

Farmers Protest: अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढणार; राजू शेट्टींनी फुंकलं रणशिंग​

चैत्यभूमीच्या धर्तीवर सोहळा साधेपणाने करावा
दरवर्षी उत्साहात साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन भीमा कोरेगाव विजय शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. राज्यात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भीम जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर आणि महापरिर्वाणदिन चैत्यभूमीच्या धर्तीवर आंबेडकरी अनुयायांनी अभिवादनासाठी कोरेगाव भीमा येथे येण्याचे टाळावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे. 

Corona Updates: काय सांगता! पुण्यातील १०५ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं

जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने समन्वय समिती आणि आयोजक पक्ष संघटनांसमवेत दोन बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत यंदाचा उत्सव मर्यादित लोकांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या वतीने सभा, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी घरातूनच अभिवादन करून एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens should simply celebrate Vijayasthambh Abhiwadan Shaurya Din at Koregaon Bhima