'मैं कैसा मुसलमां हूं भाई?'; नसरुद्दीन शहा यांचा व्हिडिओ व्हायरल

टीम ई-सकाळ
Friday, 1 January 2021

मै हिंदुस्तानी मुसलमां हूँ..., असे शब्द असणारी ही कविता थेट मनाचा ठाव घेते. हैदरी यांनी ही कविता सर्वप्रथम 2017 मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात सादर केली होती.

मुंबई : विषय कोणताही असो आपल्याला जे चूक वाटते त्याविषयी रोखठोक भूमिका घेणाऱ्या कलावंतांमध्ये प्रख्यात अभिनेता नसरुद्दीन शहा यांचे नाव आहे घ्यावे लागेल. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहून भलेही त्यावरून आपल्यावर कुणी टीका केली तरीही धाडसीपणे समोरच्याला चार शब्द सुनावण्याची ताकद नसरुद्दीन शहा यांच्यात आहे. सध्या त्यांच्या एका कवितेचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. 

हृतिक रोशनने न्यु इयर पार्टीमध्ये 'एक पल का जीना'वर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल​

जे सांगायचे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ देऊन वैचारिक मांडणी करण्यातही शहा ओळखले जातात. आता त्यांनी एआपल्याला जे विचार मांडायचे होते, जी गोष्ट आपल्या मनात कित्येक दिवसांपासून होती ते हुसैन साहेब केव्हाच बोलून व्यक्त झाले असं म्हणत नसिर यांनी एक कविता सादर केली आहे. मै हिंदुस्तानी मुसलमां हूँ..., असे शब्द असणारी ही कविता थेट मनाचा ठाव घेते. हैदरी यांनी ही कविता सर्वप्रथम 2017 मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात सादर केली होती. 

व्हिडिओ: रणबीर कपूरने नवीन वर्षात दिलं सरप्राईज, आगामी 'ऍनिमल' सिनेमाची केली घोषणा​

ती कविता अशी आहे की,
सड़क पर सिगरेट पीते वक़्त
जो अजां सुनाई दी मुझको
तो याद आया के वक़्त है क्या
और बात ज़हन में ये आई
मैं कैसा मुसलमां हूं भाई?

मैं शिया हूँ या सुन्नी हूँ
मैं खोजा हूँ या बोहरी हूँ
मैं गांव से हूँ या शहरी हूँ
मैं बाग़ी हूँ या सूफी हूँ
मैं क़ौमी हूँ या ढोंगी हूँ....

व्हिडिओ: 'त्रिभंगा'मध्ये काजोलचा पॉवरफुल लूक, टिझर रिलीज​

खरं तर गेल्या काही महिन्यांपूर्वी हुसैन हैदरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्याविषयी त्यांनी आपल्या सॊशल अकाऊंटकर लिहिले आहे. ते म्हणतात, खरंतर दहा महिन्यांपूर्वीचाच व्हिडीओ आहे. ज्याबाबत मला सोशल मीडियामार्फत माहिती मिळाली'. एका आगळ्या वेगळ्या विषयाची मांडणी करून समाजातील जात, धर्म यांच्यातील वास्तव उलगडून दाखविण्याचे काम या कवितेने केले आहे. जात, धर्म, पंथ या निकषांवर समाजाची, नव्हे तर देशाचीही विभागणी करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या अनेकांसाठी ही कविता म्हणजे सणसणीत उत्तर म्हणावे लागेल.

- मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hussain Haidry Shared video of Naseeruddin Shah reciting Hindustani Musalmaan