पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे लक्ष : आढळराव पाटील

कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने शक्य असेल ते योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
adhalrao patil
adhalrao patilSakal Media

मंचर : पुणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडून दररोज कामकाजाचा आढावा घेतला जातो. आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने शक्य असेल ते योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार रमा जोशी, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, डॉ. ताराचंद कराळे, राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, जयसिंग एरंडे, सरपंच अंकुश लांडे, उपसरपंच दत्ता तळपे, उपस्थित होते. “लांडेवाडी येथे पुणे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ३० बेड्चे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.” असे सरपंच अंकुश लांडे यांनी सांगितले.

adhalrao patil
पिंपरी ; ‘मोफत बेड’साठी मागितले एक लाख

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, “रुग्णालयात भरतीसाठी व ऑक्सिजन बेडसाठी दररोज मला शेकडो लोकांचे फोन येतात. ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लांडेवाडी येथे कोविड सेंटर करावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार व तालुका प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता, प्रशासनाकडे असलेली डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पायोनियर हॉस्पिटलचे संचालक डॉ.ताराचंद कराळे यांच्या माध्यमातून तीन डॉक्टर व चार ब्रदर्स उपलब्ध झाले आहेत. यासह भैरवनाथ पतसंस्था व भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने टेबल-खुर्च्या, पंखे, टीव्ही, लाईट साहित्य, भोजन व्यवस्था आदी कामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायत लांडेवाडी यांनीदेखील आवश्यक साहित्य कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिले आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन एकदिलाने कोरोनाचा सामना केल्यास हा लढा आपण लवकरच यशस्वीपणे जिंकू.” “शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णांना पिण्याचे गरम पाणी मिळावे यासाठी वॉटर डिस्पेंसर मशीन तसेच चार वॉटर गिझर कोविड सेंटरला स्वखर्चाने भेट म्हणून दिले आहेत.” अशी माहिती भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे यांनी दिली. डॉ. सुरेश ढेकळे यांचे मनोगत झाले.

adhalrao patil
पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com