पवार कुटुंबाचे श्रेय नाकारणे हा करंटेपणा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

बारामती : शरद पवार यांनी हे कृषी प्रदर्शन सुरु असलेल्या माळरान जमिनीवर नंदनवन फुलविले आहे. शरद पवार यांनी कुटुंबातील प्रत्येकाने करुन दाखविले आहे. यात राजेंद्र पवार, अजित पवार यांचे नाव घेता येतील. पवार कुटुंबाचे श्रेय नाकारणे हा करंटेपणा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या बहुचर्चित 'कृषिक 2020'चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमीर खान, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवित असलेले आधुनिक तंत्रज्ञान, शेती व शेतीपूरक व्यवसायाची निगडित सर्व विषयावरची माहिती उपस्थित मान्यवरांना ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, की गेल्या महिन्यात पवारसाहेबांनी प्रेमाने आणि आग्रहाने या प्रदर्शनाला येण्याचे आमंत्रण दिले होते. मुंबईतही अनेक प्रदर्शने भरतात, पण त्यातून साधले काय जाते हे कळत नाही. पण, येथे येऊन कळले की मी मोठ्या अनुभवाला मुकलो असतो. प्रात्यक्षिकांसह हे प्रदर्शन आहे. नुसते मोठ-मोठे तत्वज्ञान येथे दिले जात नाही. अभिमान वाटावे असे काम त्यांच्या कुटुंबियांनी करून दाखविले आहे. यामध्ये राजेंद्र पवार किंवा अजित पवार असतील. या जागी माळरान होते, त्याठिकाणी नंदनवन उभे करून दाखविले आहे. माझ्या शेतीमध्ये नव-नवे तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे.

इथं येऊन मला लहानपण आठवले
बारामती कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी फुलांचे ताटे पाहून मला लहानपणाची आठवण झाली. बाळासाहेब आणि माँसाहेब आमच्या निवासस्थानी फुलांचे वाफे केले होते. 

घड्याळवाले आमचे पार्टनर
एका शेतकऱ्याने तांदळाची नवे वाण शोधल्यानंतर त्याला त्याच्या हातातील घड्याळ्याच्या कंपनीचे एचएमटी नाव दिले होते. आज योगायोग पाहा घड्याळवाले आमचे पार्टनर आहेत. वेळ जुळून आली की सगळे ठरते.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com