सीएनजी पंपांना मुंबईत परवानगी; पुण्याला डावलले

पेट्रोलियम विस्फोटक सुरक्षा संगठनाच्या (पेसो) आडमुठ्या धोरणांमुळे पुण्यात सीएनजी पंपांचा विस्तार झाला नाही.
CNG gas
CNG gasSakal
Summary

पेट्रोलियम विस्फोटक सुरक्षा संगठनाच्या (पेसो) आडमुठ्या धोरणांमुळे पुण्यात सीएनजी पंपांचा विस्तार झाला नाही.

पुणे - पेट्रोलियम विस्फोटक सुरक्षा संगठनाच्या (पेसो) (Peso) आडमुठ्या धोरणांमुळे पुण्यात (Pune) सीएनजी पंपांचा (CNG Pump) विस्तार झाला नाही. पुण्यासारख्या शहरात जागेच्या उपलब्धतेवर मर्यादा असताना जागेच्या मुद्दयांवर ‘पेसो’ने पुण्यात सीएनजी विस्तारण्यास मर्यादा निर्माण केली. असे असले तरी मुंबईत कमी जागेत सीएनजीचे आउटलेट सुरु करण्यास परवानगी दिली, मात्र पुण्यात नाकारले. याशिवाय स्थानिक प्रशासनही पंपांविषयी जागरूक नसल्याने पुणेकरांच्या नशिबी रांगच आहे.

पेट्रोल अथवा सीएनजी पंप सुरु करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेसो विभागाची परवानगी आवश्यक असते. पेसोने पंप सुरु करताना सध्या चालू असलेल्या पंपावर किमान एक ते दोन गुंठ्यांची मोकळी जागा असण्याची अट घातली आहे. तसेच, नोझलपासून सुमारे ३० फूट मोकळी जागा सोडणे बंधनकारक केले आहे. मुंबईत परवानगी देताना मात्र या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे या क्षेत्रांतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पुण्यात सीएनजीचा विस्तार झाला नाही.

शहरात किमान ६० पंप आवश्यक

पुण्यात सध्या दोन ते तीन लाख वाहने सीएनजीवर धावत आहेत, मात्र पंप १२ ते १५ ऐवढेच आहेत. वाहनांची संख्या लक्षात घेता व सीएनजीची रांग हटण्यासाठी पुण्यात किमान ६० सीएनजीचे पंप असणे आवश्यक आहे. आता अस्तित्वात असलेल्या पेट्रोलपंपांवर सीएनजी पंप सुरू करण्यास काही अडचण नाही. पेट्रोल भरण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा सीएनजी भरण्यास जास्त वेळ लागतो. सीएनजीचा प्रेशर अधिक असतो. त्यामुळे काही गडबड झाली तर स्फोट होण्याची शक्यता असते.

‘पेसो’च्या काही नियमांमुळे पुण्यात सीएनजी पंपांचा विस्तार झाला नाही. मुंबईत परवानगी दिली; मग पुण्याला का नाही?, या प्रश्नी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांना भेटणार असून पुण्यात सर्वच पंपांवर सीएनजी सुरू करण्याची मागणी करणार आहोत.

- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com