अरे वा, पुणे जिल्ह्यात उभारणार सहकारी तत्वावर रुग्णालय

Hospital
Hospital

नारायणगाव (पुणे) : पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून होणारी गर्दी कमी व्हावी, ग्रामीण भागातील रुग्णांना माफक दरात अद्ययावत उपचार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालय सुरू करण्यास सहायक निबंधक यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे.

सहकारी तत्वावर ग्रामीण भागात सुरू होणारे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हे पहिले रुग्णालय आहे, अशी माहिती सहायक निबंधक यशवंती मेश्राम व मुख्य प्रवर्तक डॉ. हनुमंतराव भोसले यांनी दिली. सहकार व पणन खात्याचे उपआयुक्त डॉ. आनंद जोगदंड यांच्या संकल्पनेतून या संस्थेची निर्मिती करण्यात आली असून, संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. हनुमंतराव भोसले व डॉ. रामदास उदमले हे आहेत. 

डॉ. भोसले यांनी सांगितले की, सध्या कोविड १९ विषाणूजन्य रोगाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित व इतर अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळावेत व शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा म्हणून सहकार तत्वावर हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागात रुग्णांचे होत असलेले आर्थिक शोषण थांबविणे, हा या रुग्णालयाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजूंना अत्यल्प दरात उपचार देण्याचे काम हे सहकारी रुग्णालय करणार आहे. 

या व्यतिरिक्त शिवनेरी सहकारी व संशोधन केंद्र रुग्णालय संस्थेमार्फत रोग प्रतिबंधक उपक्रम राबविणे, केंद्र व राज्य शासनाचे आरोग्य विषयक उपक्रम चालू ठेवणे, रुग्णालया सबंधीत पॅरामेडिकल स्टाफ करीता प्रशिक्षण केंद्र चालविणे, नर्सिंग कोर्सेस बी.पी.एन., ऍक्युप्रेशर थेरपी, स्वच्छता निरीक्षक, डी.एम.एल.टी हॉस्पिटल मॅनेजमेंट, पब्लिक हेल्थ एज्युकेशन, नर्सिंग सेवक, प्रशिक्षण कोर्सेस सुरू करणे, वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू करणे, नागरिकांना शैक्षणिक सवलती मिळून देणे, उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शन करणे, वैद्यकीय साहित्याची निर्मिती करून त्याची विक्री योग्य दराने करणे आदी उद्दिष्ट या संस्थेची आहेत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com